साहित्य संमेलनातील परिसंवादात मान्यवरांचा सूर; पाचवे जनसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन
साहित्य संमेलनातील परिसंवादात मान्यवरांचा सूर; पाचवे जनसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन
नांदेड - आपल्या देशातील शेतकरी नियमित आत्महत्या करत आहेत. शिवकाळाच्या तुलनेत आज जलसिंचनाचे प्रमाण अधिक आहे. शेतीत आधुनिकता आली तरी आत्महत्या का होत आहेत? त्याचे कारण आजचे धोरण हे शेतीप्रधान नाही, हे आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला जात नाही. शिवकाळातल्याप्रमाणे शेतकर्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज नाही. अतिरिक्त शेतीमाल असताना परदेशातला शेतीमाल आयात करण्याचे धोरण धोरण आखले जात आहे. शेती आणि शेतकरी वाचविण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांच्या शेतीधोरणाची आज आपल्या देशाला गरज आहे. शिवकालीन धोरण अवलंबल्यास देशाचा विकास होईल असा सूर वक्त्यांच्या भाषणातून ऐकायला मिळाला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत बालाजी थोटवे हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून गजानन वानखेडे आणि ॲड. गंगाधर सावळे यांची उपस्थिती होती. तसेच स्वागताध्यक्ष सतिश पाटील मातुळकर, निमंत्रक बालाजी सूर्यतळे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, डी. डी. ध कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, शंकर गच्चे, कैलास धुतराज, रणजित गोणारकर, चंद्रकांत कदम, प्रल्हाद घोरबांड, रुपाली वागरे वैद्य, जीवन मांजरमकर, दत्ताहरी कदम आदिंची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या व सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती मातुळच्या वतीने मौ. मातुळ येथे राज्यस्तरीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषिविषयक धोरण आणि आजचे वास्तव' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात बोलताना गजानन वानखेडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांचे, रयतेचे राजे होते. त्यांनी शेतकऱ्यांची व कुळांची अवस्था पाहिली होती. म्हणून त्यांनी स्वराज्यात शेती धोरणात आमूलाग्र सुधारणांद्वारे नवे परिवर्तन घडविण्याचे प्रयत्न सुरू केले. शेतकरी सुखी तर रयत सुखी आणि रयत सुखी तर राजा सुखी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे मुख्य प्रधान सूत्र होते. स्वराज्याच्या हिताचे रक्षण करणारे
छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. ॲड. गंगाधर साळवे यांनी आपले सखोल चिंतन मांडले. शेतकऱ्यांचे हित हेच राज्याचे हित, असे त्यांचे धोरण होते. शेतकऱ्यांना जमिनी कसायला देताना बी बियाणं दिलं जातं. औतफाट्यास मदत दिली जात होती.
नव्यानं शेती करणाऱ्यांसाठी महसूल देखील कमी ठेवलेला होता. करवसुलीच्या रचनेत देखील बदल केल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. तागाई आणि इस्तावा तत्त्वांचा वापर करून नवीन जमिनी नांगरणीखाली आणल्या गेल्या.
शेतकऱ्यांना बियाणे आणि गुरेढोरे अनुदानित केले गेले.
गावाचे मूल्यांकन करताना लागवडीयोग्य पडीक जमिनी वगळण्यात आल्या होत्या. यासंबंधीची विविध उदाहरणे व दाखले देत त्यांनी आपली भूमिका मांडली.
अध्यक्षीय समारोप करताना बालाजी थोटवे यांनी आजच्या परिस्थितीत निर्माण झालेले शेतीचे वास्तव भीषण असे आहे. यात अमुलाग्र बदल घडवून आणायचाअसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषिविषयक धोरण लागू करावे लागेल, त्याशिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले. या सत्राचे प्रास्ताविक प्रल्हाद घोरबांड यांनी केले. सूत्रसंचालन शंकर गच्चे यांनी तर आभार प्रज्ञाधर ढवळे यांनी मानले. या सत्रालाही गावकऱ्यांचा विशेष प्रतिसाद लाभला. या सत्राच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळाचे पदाधिकारी व सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती मातुळच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0