महात्मा बसवेश्वर महाविद्यालय राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कृष्णा धरणे यांचा सत्कार
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कृष्णा धरणे यांचा सत्कार
लातूर दि.१५ मार्च
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक विद्यार्थी कृष्णा धरणे यांनी स्टेट एनएसएस सेल, बेऱ्हाणपूर युनिव्हर्सिटी, ओडिसा, आणि उच्च शिक्षण विभाग, ओडिसा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०३ ते ०९ मार्च २०२५ या कालावधीमध्ये बेऱ्हाणपूर युनिव्हर्सिटी, ओडिसा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिर २०२५ मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात एका विशेष समारंभात त्याचा सत्कार दरबंगा (बिहार) येथील प्रसिद्ध उद्योजक राहुल मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर, प्राचार्य प्रोफेसर डॉ. संजय गवई, मुख्य समन्वयक डॉ. भास्कररेड्डी नल्ला, समन्वयक डॉ. बाळासाहेब गोडबोले आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. भाऊसाहेब पुरी यांची उपस्थिती होती.
कृष्णा धरणे यांनी मिळविलेल्या राष्ट्रीय पातळीवरील या पारितोषिक बद्दल संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसेचिंचोलीकर, सहसचिव सुनील मिटकरी, कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीपकुमार दिंडेगावे आणि इतर सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. मनोहर चपळे, प्रा. किसनाथ कुडके यांच्यासह, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, शाखा समन्वयक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0