थायलंडच्या बौद्ध उपासक उपासिकांकडून खुरगावच्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास १०० चिवरदान
थायलंडच्या बौद्ध उपासक उपासिकांकडून खुरगावच्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास १०० चिवरदान
नांदेड - तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात अनेक श्रामणेर भिक्षू वास्तव्यास असतात. धम्म चळवळीचे विविध उपक्रम या ठिकाणी घेतले जातात. या श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष भदंत पंयाबोधी थेरो हे थायलंड दौऱ्यावर असतांना तेथील काही बौद्ध उपासक उपासिकांनी प्रशिक्षण केंद्रातील संघाकरिता पंयाबोधी थेरो यांना १०० चिवर दान केले. यावेळी रत्ना विप्सुमपुमफिचित, नार्वपोर्न कन्याबोव्ह्न, स्वपा पीबी, ससीपत्त किलशेव्हरेक, ससिकरन, जिथ चोकोलेट, पिव्ह शोव्ह, बोध्व, के. कमशी, के. पी इव्ह, हिया टिक, के. सॅम के साॅ, थोंग्सा, ॲन जाॅन, पँग बँन्थाई मेसेज, पव्हॅड, के. गित्व, के. गिटार, के. माया, के. सिफा, के. सुरेचाॅय, टोनी रत्ना या बौद्ध उपासक उपासिकांची उपस्थिती होती.
थायलंड हे जगातील प्रसिद्ध बौद्ध राष्ट्र आहे. या देशांमध्ये विनय पीटकाचे जतन करण्यात आले आहे. या देशात पन्नास हजाराच्यावर बुद्ध विहार आहेत. थायलंड राष्ट्र हे दानाच्या बाबतीमध्ये अग्रेसर असून देश विदेशामध्ये त्यांनी सुंदर अशा असंख्य बुद्धाच्या मुर्त्या दान केलेल्या आहेत. भारताला सुद्धा खूप बुद्धांच्या मुर्त्या त्यांनी दान स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत. थायलंडमध्ये शुद्ध सोन्याची साडेपाच हजार किलो वजनाची भगवान बुद्धाची मूर्ती आहे. ती २८२ फूट उंच असून बसलेली पाकनाम टेम्पल मध्ये भगवान बुद्धाची सुंदर मूर्ती आहे. रिकलाईंग बुद्धा टेम्पल मध्ये १५५ फूट लांबीची भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रा आहे. त्या ठिकाणावर शेकडो मुर्त्या भगवान बुद्धाच्या पाच फूट सहा फूट सात फुटाच्या बघायला मिळतात. थायलंड हे राष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अतिशय काळजी घेत असते. चायनाशी असे तेथील समुद्राचे नाव असून त्या मधील पाणी अतिशय स्वच्छ आणि निर्मळ आहे जगातले पर्यटक त्या ठिकाणावर येऊन आनंद घेत असतात. त्या ठिकाणाला कोरल आयलँड असे म्हणतात. थायलंडच्या उपासक उपासिकांनी अतिशय श्रद्धायुक्त चित्ताने श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव तालुका जिल्हा नांदेड साठी १०० चीवर दान दिले. ते घेऊन भदंत पंयाबोधी थेरो परतले आहेत.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0