भाजपा प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आ. रमेशआप्पा कराड यांचे आवाहन
भाजपा प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आ. रमेशआप्पा कराड यांचे आवाहन
लातूर दि.०३- संपूर्ण राज्यात भाजपा सदस्यता अभियान सुरू झाले असून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात पक्षश्रेष्ठीने दिलेल्या उद्दिष्टाहून अधिक सदस्यांची नोंदणी करून प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सदस्यता अभियान राबवले जात असून हे अभियान लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात यशस्वी करण्यासाठी मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ प्रमुखांची व्यापक बैठक आमदार रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील भाजपा संवाद कार्यालयात शुक्रवारी दुपारी झाली. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, पंचायतराज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, रेणापूर तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
सर्वाधिक सदस्य असलेला जगातील एकमेव भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष असून या पक्षाचे नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात लाखो कार्यकर्ते कार्यरत आहेत असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, भाजपा राष्ट्रीय पक्षश्रेष्ठनी यावेळी देशभरात २१ कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदार संघात ६० हजार सदस्य करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
निवडणुकीत भाजपा यश अपयश निकाल काहीही लागला तरी दुसऱ्या दिवसापासून पक्ष कायम कामात आहे लातूर ग्रामीण मतदार संघात भाजपाचा विजय होईल हे कोणालाही शक्य वाटत नव्हते मात्र कार्यकर्त्याच्या मेहनतीतून हे शक्य झाले पंधरा वर्षाच्या संघर्षाला आणि मेहनतीला फळ आले असे सांगून येणारा काळ हा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत, सोसाट्या या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्याला यश मिळाले पाहिजे यासाठी सदस्यता नोंदणी अभियान महत्त्वपूर्ण असल्याचे बोलून दाखविले.
मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख यांनी सदस्यता नोंदणी अभियानात जातीने लक्ष घालून सर्वांना सोबत घेऊन प्रत्येक बूथवर घरोघरी जाऊन किमान दोनशे भाजपाचे सदस्य करावेत आणि पक्षश्रेष्ठीने दिलेल्या उद्दिष्टाहून अधिक किमान ७५ हजार भाजपा सदस्य लातूर ग्रामीण मतदार संघातून झाले पाहिजेत यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी अशी सूचना आ. रमेशआप्पा कराड यांनी यावेळी बोलताना केली.
निवडणूक झाली, निकाल लागला, सर्वांचे स्वप्न साकार झाले आता मतदार संघातील सर्व जनता आपली आहे, आपण जनतेचे आहोत असे समजून भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सर्वांना सोबत सार्वजनिक, सामाजिक आणि वैयक्तिक कामे करावीत. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करून न्याय देण्याचा प्रयत्न करावा असेही यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले. प्रारंभी दशरथ सरवदे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.
भाजपा सदस्य नोंदणी अभियान लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात यशस्वी व्हावे यासाठी लातूर आणि रेणापूर या दोन्ही तालुक्यांसाठी स्वतंत्रपणे अभियान समिती नियुक्त करण्यात आली असून रेणापूर तालुक्यांसाठी संयोजक महेश गाडे, सहसंयोजक अमर चव्हाण, अनुसया फड, राजकुमार मानमोडे, श्रीकृष्ण पवार, अजय दौंड यांची तर लातूर तालुक्यासाठी संयोजक सुरज शिंदे, सहसंयोजक शितल पाटील, संजय ठाकूर, सुरेखा पुरी, शामसुंदर वाघमारे, बालाजी गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0