प्रभू श्रीराम जन्मसोहळा आणि ‘श्रीराम’ रथ उत्सव
प्रभू श्रीराम जन्मसोहळा आणि ‘श्रीराम’ रथ उत्सव
लातूर दि.०७ - भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, त्याग आणि समर्पणाचे मूर्तीमंत प्रतीक, समस्त भारतीयांचे श्रध्दास्थान असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मसोहळ्याच्या निमित्ताने सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले भारतीय संस्कृती दर्शन - ‘श्रीराम’ रथ यात्रा सोहळा मोठा उत्साहाच्या आणि भक्तिमय वातावरणात लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर (रूई) येथे रामनवमी रविवार रोजी पार पडला. या सोहळ्यास रामेश्वर आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भाजपा नेते लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड हे आवर्जून उपस्थित होते.
पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का दादाराव कराड यांनी श्रीराम मंदिरास अर्पण केलेल्या सुंदर, रेखीव व वैशिष्ट्यपूर्ण अशा भारतीय संस्कृती दर्शन- श्रीराम रथाची, रामेश्वर गावत ग्रामप्रदक्षिणा झाली प्रभू रामचंद्राचा जयघोष करीत या रथयात्रेत वाजंत्रीसह विविध भजनी मंडळी, टाळकरी, असंख्य भव्य ध्वज हातात घेऊन भाविक भक्त सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहाच्या आणि भक्तीवातावरणात निघालेल्या या रथयात्रेत महिला पुरुष सर्व स्तरातील नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या रथ यात्रेनंतर प्रभू श्रीराम मंदिरात ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगावकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
श्रीराम रथ यात्रा सोहळ्यास माइर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथजी कराड, ज्येष्ठ मार्गदर्शक तुळशीरामअण्णा कराड, प्रतिष्ठित शेतकरी काशीरामनाना कराड, भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड, डॉ. हनुमंत कराड, बालासाहेब कराड, राजेश कराड, सौरभ कराड, ऋषिकेशदादा कराड, तेजस कराड, पृथ्वीराज कराड, राजवीर कराड यांच्यासह संपूर्ण कराड परिवाराची प्रमुख उपस्थिती होती. रामेश्वर आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0