(सर्व शेतकरी संघटनांनी सहभागी होण्याचे अनिल घनवट यांचे आवाहन)
(सर्व शेतकरी संघटनांनी सहभागी होण्याचे अनिल घनवट यांचे आवाहन)
पंजाब मधील शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकार देत असलेल्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी व सरदार डल्लेवाल यांनी उपोषण सोडावे यासाठी दिनांक २० जानेवारी रोजी, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
एक वर्ष होत आले आहे, पंजाब आणि हरियाणा राज्यांच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेती व्यवसायातील अनिश्चितता व असुरक्षितता पाहता या शेतकरी संघटनांनी उत्पन्नाची हमी मागितली आहे. त्यासाठी, कोणीही किमान आधारभूत किमती पेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करू नये असा कायदा करण्यात यावा, शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे, भूमी अधग्रहण कायदा व इतर काही मागण्या आहेत. आपले म्हणणे सरकार दरबारी मांडण्यासाठी हे शेतकरी दिल्लीला जाण्यासाठी पंजाब मधून निघाले मात्र हरियाणा राज्याच्या सरहद्दीवर त्यांना रोकण्यात आले आहे.
कृषी मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवावा अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. अकरा महिने झाले तरी केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेण्यास तयार नाही असे पाहून भारतीय किसन युनियन (अराजनैतिक) या संघटनेचे अध्यक्ष सरदार जगजितसिंग डल्लेवाल यांनी उपोषणाला सुरुवात केली. आज पन्नास दिवस उलटून गेले तरी सरकार बोलणी करण्यास तयार नाही. पन्नास दिवसात त्यांनी पाणी सोडून काहीच ग्रहण केलेले नाही. आता पाणी सुध्दा उलटी द्वारे बाहेर येत आहे.
सत्तर वर्षाचे, कॅन्सर पीडित सरदार डल्लेवाल शेतकऱ्यांसाठी आपले प्राण त्यागण्यास तयार झाले आहेत. तेथे झालेल्या गोळीबारात एक तरुण शेतकऱ्याने आपला जीव गमावला आहे. सरकारने केलेल्या कारवाईत अनेक जखमी झाले असून आहेत, काहींची दृष्टी गेली आहे.
एका शेतकरी आंदोलनाला ज्या पद्धतीने सरकार वागणूक देत आहे हे अतिशय निषेधार्ह आहे. शांततेच्या मार्गाने अतिशय अहिंसक पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे. आंदोलन चिरडण्यासाठी सरकार आंदोलन हिंसक होण्याची वाट पाहत आहे.
सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पंधरा मागण्या आहेत. त्यापैकी बऱ्याच मागण्या सर्वांना मान्य आहेत. काही मागण्या बाबत सहमती नाही पण शेतकरी आंदोलकांचे म्हणणेच सरकार ऐकून घेणार नसेल तर मार्ग कसा निघेल? काय हरकत आहे पंतप्रधान किंवा कृषी मंत्र्यांनी त्यांच्या शिष्टमंडळा बरोबर चर्चा करायला? जे शक्य असेल ते मंजूर करा नसेल ते का करता येत नाही ते समजून सांगावे असे मत घनवट यांनी निवेदनात मांडले आहे.
सरकारला देशातील शेतकरी चळवळ मोडीत काढायची आहे. आज पंजाबच्या शेतकऱ्यांना चरडतील, उद्या महाराष्ट्रातल्या, देशात शेतकरी चळवळ बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. आता पूर्ण भारतातील शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सरकारच्या या वर्तणुकीचा निषेध करायला हवा.
आंदोलनातील काही मागण्या शरद जोशींचे व्यापार स्वातंत्र्य व तंत्रज्ञान स्वातंत्र्याच्या विरोधात असतील पण हे, त्यांच्या या विषयाच्या अज्ञानामुळे आहे किंवा त्यांना आता पर्यंत भरविण्यात आलेल्या चुकीच्या माहितीमुळे आहे. परंतू शेतकऱ्यांचे भले व्हावे ही त्यांची प्रामाणिक भूमिका आहे. अनिल घनवट व त्यांचे सहकारी, खानोरी व शाभू बॉर्डर वर सुरू असलेल्या आंदोलनात तीन दिवस राहून, आंदोलनातील नेत्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. एका शेतकरी नेत्याने आपले प्राण पणाला लावले आहेत. दिनांक १५ जानेवारी पासून आणखी १११ शेतकऱ्यांनी प्राणांतिक उपोषण आरंभ केले आहे. शेतकरी संघटनांनी आपापसातील वाद कुरवाळत बसण्याची ही वेळ नाही. मतभेद नंतर एकत्र बसून मिटवता येतील पण सरकारच्या दहशतीला लगाम घातला नाहीतर खुल्या व्यवस्थेसाठी आंदोलन करण्याची वेळ आली तर असेच वागवले जाईल याचीच शक्यता जास्त आहे. बंदिस्त व्यवस्था सरकारच्या फायद्याची आहे ती अशीच सुरू रहावी यासाठी स्वातंत्र्याची आंदोलने अधिक कठोरपणे चिरडली जातील.
पंजाबच्या आंदोलनातील सर्व मागण्यांना सर्व शेतकरी संघटना समर्थन देऊ शकत नसल्या तरी केंद्र शासनाचा निषेध मात्र नक्की करायला हवा. *या साठी स्वतंत्र भारत पक्षा तर्फे, दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर, सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनात सर्व शेतकरी संघटना, सर्व पक्ष व शेतकरी हितेशी चळवळींनी भाग घ्यावा अशी अपेक्षा आहे.*
देशभर होत असलेल्या शेतकरी आत्महत्या कायमच्या थांबवायच्या असतील व सरकारच्या दडपशाहीला पायबंद घालायचा असेल तर भारतातील सर्व शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या हितचिंतकांनी एकदा आपली एकजुटीची ताकद दाखवणे अत्यावश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष कल्याणाच्या हुरदळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, बाबाराव पाटील,माजी जिल्हाध्यक्ष माधव मल्लेशे,माधव कंदे,मदन सोमवंशी,युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, हरिश्चंद्र सलगरे,वसंत कंदगुळे, प्रकाश पंडगे,मोहन गवळी,तालुकाध्यक्ष किशनराव शिंदे, जनार्दन पाटील,करणं भोसले, अण्णाराव चव्हाण, इब्राहिम शेख,अर्जुन कावळे, नितेश झांबरे,समाधान क्षिरसागर,केशव धनाडे, दत्ता पाटील, भाऊसाहेब दिवे,शंकर निला, जनार्दन डाके, राजाराम पाटील, दत्ता मुगळे,रामदास गिरी,विठ्ठल संपते, दत्ता गुंजीटे,आदिंनी केले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0