दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची पॅथॉलॉजिकल लॅबला भेट व प्रशिक्षण
दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची पॅथॉलॉजिकल लॅबला भेट व प्रशिक्षण
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील एम.एस्सी.द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी लातूर येथील निर्णय पॅथॉलॉजिकल लॅबला भेट दिली आणि तीन दिवस प्रशिक्षणही घेतले.दि.10 ते 12 मार्च 2025 या दरम्यान तीन दिवस मेडिकल पॅथॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमास असलेल्या मेडिकल लॅबोरेटरी टेकनॉलॉजी या विषयाचे ज्ञान वृद्धिंगत करणे तसेच विद्यार्थ्यांचा पॅथॉलॉजिकल लॅबमधील विविध प्रॅक्टिकल्स व टेक्निक्स समजून घेणे हा होता.
या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजिकल लॅबमधील एच.पी.एल.सी,ईएलआयएसए ब्लड टेस्टिंग मशीन,आरटीपीसीआर,आरनए एक्सट्राकशन मशीन,सेल काऊंटर मशीन ज्यामध्ये कंप्लेंट ब्लड काऊंट केला जातो, सिरॉलॉजिकल मशीन, लुमिनन्स बायोकेमिस्ट्री ,युरीन विश्लेषक- ज्याचा युरीन एस्टीमेशनसाठी सेमी ऑटोमॅटेड मशीन ज्याचा बायोकेमिस्ट्रीसाठी,हेमोस्टासिस विश्लेषकचा प्लास्मा कॉऊंटिंगसाठी,इलेक्ट्रॉलीटे मशीन ज्याचा - सोडियम आणि पोटॅशियम काढण्यासाठी होतो.अशा अनेक अत्याधुनिक टेक्निकचे प्रशिक्षण घेतले.यासाठी निर्णय पथोलॉजिकल लॅबचे डायरेक्टर एम.डी.पॅथाॅलाॅजीस्ट डॉ.शिवराज कंठीकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले तर लॅब टेक्निकशयन गोविंद गुरूदेव,अमीर सय्यद, मुसेब शिरगांपुरे यांनी सर्व पॅथाॅलाॅजिकल टेक्निशयनचे प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.ए.मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर या प्रशिक्षणाचे नियोजन सूक्ष्मजीवशास्त्र पदव्युत्तर समन्वयक प्रा.शितल पाटील व प्रा.एम.आर.मालू यांनी केले तर विभागातील एकूण 19 विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.यासाठी डॉ.महेश करळे, डॉ.डी.डी.ढेरे ,प्रा.एस.एस.धुतेकर,प्रा.एस.बी.टेकाळे,प्रा.ए.आर. इंगळे,संतोष सूर्यवंशी,माधव सूर्यवंशी,अशोक मदने यांचे देखील सहकार्य लाभले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0