जागतिक वन्य दिनानिमित्त 'वन्यजीव संरक्षण ' चित्रफित प्रदर्शन
जागतिक वन्य दिनानिमित्त 'वन्यजीव संरक्षण ' चित्रफित प्रदर्शन
नांदेड - जागतिक वन्य जीव दिनानिमित्त जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वन्यजीव संरक्षण याबाबत चित्रफित दाखवण्यात आली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना जैवविविधता संरक्षण आणि संवर्धनासाठी बालवयापासूनच प्रयत्न व्हावेत यासाठी वन्य प्राणी आणि वनस्पती याबाबत माहिती देण्यात आली. रविवारची सुट्टी असतांनाही विद्यार्थी आणि काही ग्रामस्थांच्या सहभागातून मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे तसेच सहशिक्षक संतोष घटकार यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव संरक्षण ही वीस मिनिटांची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, उपाध्यक्ष चांदू झिंझाडे, माजी सरपंच कैलास गोडबोले, मारोती चक्रधर, आनंदा गोडबोले, हरिदास पांचाळ, इंदिरा पांचाळ, मनिषा गच्चे, पांडुरंग गच्चे, पंकज गोडबोले, सुलक्षणा गच्चे, साहेब ससाणे, हैदर शेख, विकास गोडबोले, विलास गोडबोले, सूरज गोडबोले आदींची उपस्थिती होती.
जागतिक वन्यजीव दिनाचे महत्त्व फार मोठे आहे. वन्यजीवांबाबत मुलांमध्ये भीती, घृणा किंवा शिकार अथवा ठार मारण्याची मानसिकता कमी होऊन वन्य प्राण्यांच्या नामशेषामुळे पर्यावरणाच्या समतोलावरच परिणाम होत नाही तर विकासावरही परिणाम होतो. यासाठी वन्य प्राणी आणि वनस्पतींचे संवर्धन होणे कसे आवश्यक आहे, याबाबतची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण यासाठी आणि लुप्त होत असलेल्या प्राणी आणि वनस्पती यांच्या विविध प्रजातींच्या संवर्धनासाठी जनजागृतीचा छोटासा प्रयत्नही यानिमित्ताने करण्याच्या उद्देशाने वन्यजीव संरक्षण चित्रफित पदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी उपाय शोधून तसेच ग्रामीण भागातील वन्यजीवांचे जतन करून जमिनीवरील जीवसृष्टी टिकवून ठेवता येते याबाबतची माहिती मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी उपस्थितांना दिली.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0