वृतपत्र-विक्रेत्यांचा-मोफत-अन्नसेवा-योजना-या-सामाजिक-उपक्रमास-09-वर्ष-पुर्ण
वृतपत्र-विक्रेत्यांचा-मोफत-अन्नसेवा-योजना-या-सामाजिक-उपक्रमास-09-वर्ष-पुर्ण
लातूर : 26 जानेवारी 2016 पासुन वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन लातूर च्या वतीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय लातूर येथील रूग्णांच्या नातेवाईकांसाठी दानशुरांच्या सहाय्याने सरु असलेल्या मोफत अन्नसेवा योजना या सामाजिक उपक्रमास 09 वर्ष पुर्ण झाले.या दिवसात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या सहभागी झाल्याबद्दल सर्व दानशूरांचे व वेळोवेळी या सामाजिक उपक्रमास मदत व मार्गदर्शन करत असलेल्या सर्व पत्रकार बांधवाचे वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन लातूर च्या वतीने आभार मानण्यात आले.
वृत्तपत्र वाटप करून जीवन जगत असताना आपण ही समाजाचे काही तरी देण लागतो या सामाजिक भावनेतून समाजाची सेवा करावी या हेतूने व रूग्णांच्या नातेवाईकास अल्पश: मदत व्हावी म्हणून हा मोफत अन्नसेवा योजना उपक्रम सुरु करण्यात आला होता. संवेदनशील लातूरकरांना या सामाजिक उपक्रमाची माहीती कळत गेली तसतसे दानशुर लातूरकर या सामाजिक उपक्रमास जाेडले जात आहेत. त्यामुळेच माेफत अन्नसेवा याेजना हा सामाजिक उपक्रम आजतागायत अविरत चालु आहे व या अन्नसेवा योजने च्या माध्यमातून दररोज 125 ते 150 रूग्णांच्या नातेवाईकास 2500 रुपये मध्ये सकस अन्नसेवा दिली जाते. अशी माहीती वृत्तपत्र विक्रेता असाेसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय किसनराव माळी- चांबारगे यांनी दिली.तसेच आजपर्यंत या सामाजिक उपक्रमात वृत्तपत्रविक्रेते, पत्रकार, पाेलीस निरीक्षक, पोलीस, शिक्षक, डॉक्टर,मंत्री, आमदार, नगरसेवक, जिल्हापरीषद सदस्य,व्यापारी तथा व्यवसायिक, ट्युशन क्लासेस शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते व ईतर सर्व दानशूर व्यक्ती यांनी वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी, विशेषदिवस निमित्त यात सहभागी होत सहकार्य केले आहे व करत आहेत अशी माहीती हि दिली. तसेच या पुढेही असेच सहकार्य राहावे ही अपेक्षा वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन लातूर चे अध्यक्ष दत्ता माळी (चांबारगे) यांनी व्यक्त केली.
अडचणीच्या काळात येथील रूग्णांच्या नातेवाईकास सहकार्य करावे व वृत्तपत्र विक्रेत्यांनी सुरु केलेला मोफत अन्नसेवा योजना हा सामाजिक उपक्रम कायम सुरु रहावा यासाठी माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री मा आ.अमितभैय्या विलासरावजी देशमुख साहेब , लातूर ग्रामीण चे आमदार मा. रमेशजी कराड साहेब , पदवीधर मतदार संघांचे आ. सतिशजी चव्हाण साहेब, शिक्षक आ. विक्रमजी काळे साहेब, माजी खासदार डॉ. सुनिलजी गायकवाड साहेब, माजी आ. धिरजजी देशमुख साहेब, विलास को ऑफ बँक लि.लातूर, अर्पण फाउंडेशन च्या वतीने विशेष आणि कायम सहकार्य करण्यात येत आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या सामाजिक उपक्रमात सर्व क्षेत्रात कामकरणा-या व्यक्ती, संस्था, संघटना, पक्ष, लोकप्रतिनिधी अशा दानशूरांनी वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी, विशेषदिवस निमित्त यात सहभागी होत आपापल्या परीने गहु, तेल, तांदूळ, आर्थिक सहाय्य देवून सहाय्य करावे व ते करण्यासाठी 9021479975 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा व रीतसर पावती घेवुन जावी असे करण्यात आले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0