अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हेर येथे शालेय साहित्य आणि फळवाटप
अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हेर येथे शालेय साहित्य आणि फळवाटप
(उदगीर): राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री
आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांच्या वाढदिवसानिमित्त हेर तालुका उदगीर येथे विविध सामाजिक उपक्रम
राबवण्यात आले.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या
वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि. २१ मार्च रोजी हेर तालुका उदगीर येथे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साळवे नगर
हेर येथे शालेय साहित्याची वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य
केंद्र हेर येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाचे आयोजन
किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंडित नाना ढगे यांनी केले.
यावेळी उपसरपंच श्री तुळशीराम बेंबडे, माजी उपसभापती सोपानराव ढगे,
बक्षुमामा पठाण, तंटामुक्ती अध्यक्ष बळवंत घोगरे, गजानन बिरादार, चेअरमन
दिलीप बिरादार, ग्रामपंचायत सदस्य वर्षाताई हेरकर, डॉ. मंगेश कुमार
हेरकर, संदीप पाटील, बबन धनबा, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मिटकरी, स्वरूप
ढगे, बापुराव मुंडे, वसंत ढगे, अमोल तवंडे, कोरे अप्पा, शिवाजी बिरादार,
दयानंद हसनाबाद, रेगुडे, कार्तिकआप्पा स्वामी, राम पेशेट्टे, राजकुमार
एनगे, शंकरसर गुरडे, आबासाहेब नरोटे, जाधव मॅडम, जीवलगे, दैवशाला मुंडे,
भांजे, स्वामी, गोपाळ घोगरे, ज्ञानेश्वर ढगे नितीन ढगे, वैभव ढगे, सचिन
ढगे, इत्यादी उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0