नुकत्याच झालेल्या विधानसभा
नुकत्याच झालेल्या विधानसभा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेकडून सदा सरवणकर, उद्धव ठाकरेंच्या पक्षाककडून महेश सावंत रिंगणात असल्याने तिथे तिहेरी लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीच्या वेळी अमित ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी आशिष शेलार यांनी भाजप महायुतीकडे प्रस्ताव पाठवा होता. मात्र त्याच आशिष शेलारांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी माणसावर होणारे हल्ले, मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या गळचेपीवर अनेकदा मनसे भाष्य करताना दिसते. मात्र मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी, असं खुलं आव्हानच आशिष शेलार यांनी दिल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर मनसे म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचा भात हा प्रकार असल्याचेही आशिष शेलार यांनी म्हणत खोचक टीका केली आहे. ‘स्वतः केलेल्या कामाची टिमकी मिरवणं, अन्य पक्षांवर टीका करणं हे काम भोपूपणाचं आहे आणि हे काम मनसे करतंय. त्यामुळे प्रत्यक्षात मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी’
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0