महात्मा-बसवेश्वर"च्या-शैक्षणिक-आणि-संशोधन-अभ्यास-सहली-यशस्वीपणे-संपन्न
महात्मा-बसवेश्वर"च्या-शैक्षणिक-आणि-संशोधन-अभ्यास-सहली-यशस्वीपणे-संपन्न
लातूर दि.२२ फेब. २०२५
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूगोलशास्त्र व तत्त्वज्ञान विभागाच्यावतीने शैक्षणिक व संशोधन अभ्यास सहली यशस्वीपणे संपन्न झाल्या.
महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने विश्वेश्वरय्या म्युझियम, बेंगलोर येथे शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. कॉम्प्युटर, भौतिकशास्त्र या विषयावरचे अनेक प्रयोग व प्रोजेक्ट यांची माहिती या सहलीत करून देण्यात आली. मुख्यत्वे सौर ऊर्जा प्रकल्प, बायोमास पासून वीज निर्मिती, थर्मल पावर स्टेशन, पवन ऊर्जा, पाणचक्की यावर आधारित अनेक प्रकल्प विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. सहलीचे प्रमुख विज्ञान शाखा समन्वयक तथा भौतिकशास्त्र, संगणक शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी आयोजन केले.
महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभागाची सहल सौताडा, कपिलधार आणि चाकरवाडी येथे संपन्न झाली. यात विद्यार्थ्यांना भौगोलिक व जैविक वैविध्य, पर्यावरण या संदर्भात माहिती देण्यात आली. या सहलीचे संयोजन डॉ. बी. एम. गोडबोले, डॉ. शिवप्रसाद इजारे, डॉ. अभय धाराशिवे, डॉ. शिवप्रसाद धरणे, डॉ. संगमेश्वर धाराशिवे, डॉ. तेजस्विनी महाजन, अशोक शिंदे यांनी केले.
महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाच्यावतीने देशाचा ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करण्याकरिता बिदर येथील नरसिंह मंदिर, ऐतिहासिक किल्ला, गुरुद्वारा, मैलार येथील खंडोबा मंदिर महात्मा बसवेश्वरांची कर्मभूमी बसवकल्याण या ठिकाणचे ऐतिहासिक पर्यटन करण्यात आले. या सहलीचे संयोजन तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. शितल येरुळे, प्रा. दयानंद बोलणे, प्रा. अलका चिकुर्डीकर, प्रा वैशाली दिवे, संशोधक विद्यार्थी जगन्नाथ कदम, सिद्धेश्वर घोडके यांनी केले.
महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने कृषी महाविद्यालय, लातूर येथे स्वर्गीय विलासराव देशमुख कृषी जैविक तंत्रज्ञान महाविद्यालयात व गळित धान्य संशोधन केंद्रास अभ्यास भेट देण्यात आली. या अभ्यास सहलीत जैविक वैविध्य विषयी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर माती परीक्षण, पिकावरील रोग यांचीही माहिती देण्यात आली. या अभ्यास सहलीचे संयोजन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दीपक चाटे, डॉ. मनोज गायकवाड, डॉ. उज्ज्वला गायकवाड, प्रा. प्रतीक्षा मामडगे प्रयोगशाळा सहाय्यक दत्ता पांचाळ यांनी केले.
महाविद्यालयातील विविध विभागांनी केलेल्या शैक्षणिक आणि संशोधनपर अभ्यास सहली बद्दल श्री. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि सर्व संचालक यांच्यासह इतर सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई, मुख्य समन्वयक डॉ. नल्ला भास्कररेड्डी, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षिका प्रा. वनिता पाटील आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
या शैक्षणिक आणि संशोधनपर अभ्यास सहलीचा महाविद्यालयातील २० प्राध्यापक आणि २२८ विद्यार्थ्यानी लाभ घेतला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0