वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी योगदान आवश्यक - डॉ. रंगनाथ नवघडे
वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी योगदान आवश्यक - डॉ. रंगनाथ नवघडे
नांदेड - आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. तसेच रिल्सच्या जमान्यात रिअॅलिटी बाजूला ठेवून आभासी जगाची निर्मिती होत आहे. हे येणाऱ्या भविष्यकाळासाठी धोकादायक ठरू शकते. खरे ज्ञान मिळवण्यासाठी वाचन आवश्यक असून यानिमित्ताने वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी सर्वसामान्यांचे योगदान आवश्यक असल्याचे मत येथील वाचनसंस्कृतीचे अभ्यासक तथा अधिव्याख्याता डॉ. रंगनाथ नवघडे यांनी व्यक्त केले. ते श्रद्धास्थळ भीमघाट येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. रंगनाथ नवघडे यांच्यासह कीर्तनकार गणपत माखणे, अॅड. प्रवीण सोनकांबळे, भारतीय सैनिक राष्ट्रपाल खाडे, रंगनाथ कांबळे, संयोजक सुभाष लोखंडे यांची उपस्थिती होती.
तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी राज्यात १ ते १५ जानेवारी दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाराष्ट्र शासनातर्फे घेतला आहे. परंतु या उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग असावा या उद्देशाने संयोजक सुभाष लोखंडे यांनी 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमांतर्गत शहरातील नालंदा बुद्ध विहार श्रद्धास्थळ भीमघाट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विद्यार्थी, कर्मचारी सर्व वाचक वर्ग 'सामूहिक वाचनासाठी' आयोजन करण्यात आले होते. या वाचन उपक्रमात आपली आवड असलेले कोणतेही पुस्तक घेऊन मिल प्रभागातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, ज्येष्ठ व्यक्ती, विद्यार्थी, मित्र परिवार यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0