डॉ. अशोक पोद्दार यांची महाराष्ट्र ऑर्थोपेडिक विभागीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशन बेस्ट चॅप्टर अवॉर्डने सन्मानित
डॉ. अशोक पोद्दार यांची महाराष्ट्र ऑर्थोपेडिक विभागीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशन बेस्ट चॅप्टर अवॉर्डने सन्मानित
लातूर : लातूर येथील ज्येष्ठ अस्थिशल्य चिकित्सक तथा पोद्दार ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरचे संचालक डॉ. अशोक पोद्दार यांची महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या विभागीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र ऑर्थो. असो.च्या वार्षिक संमेलनात लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशनला बेस्ट चॅप्टर अवॉर्ड तसेच बेस्ट महाराष्ट्र ऑर्थोपेडिक दिवस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे वार्षिक संमेलन नाशिकमध्ये पार पडले. या संमेलनात लातूर ऑर्थोपेडिक असो.चे अध्यक्ष डॉ.अशोक पोद्दार यांची विभागीय उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. अशोक पोद्दार व डॉ. संतोष माळी यांचे ऑर्थोपेडिक ,सामाजिक, वैद्यकीय शिक्षण विषयक उपक्रम, सीएमई , १२ ऑर्थोपेडिक सीएमई, ५ समाजोपयोगी उपक्रम त्याचप्रमाणे ऑर्थोपेडिक तज्ज्ञांना एकत्रित करून आऊट डोअर सीएमई च्या आयोजनातही मौलिक योगदान राहिले आहे. डॉ. अशोक पोद्दार व डॉ.संतोष माळी यांनी आपल्या कार्यकाळात लातूर ऑर्थोपेडिक संघटनेला १० एमएमसी पॉईंट मिळवून दिले आहेत. लातूर ऑर्थोपेडिक असो.च्या वतीने त्यांनी मॉर्निंग वॉकर्स संघटनेसाठी हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, बीपी, शुगर तपासणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी लेक्चर्स, वैद्यकीय कायदेविषयक लेक्चर्सच्या आयोजनातही पुढाकार घेण्याचे काम केले आहे. वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरासाठीही ते कायम आग्रही असतात. लातूरचे ज्येष्ठ ऑर्थोपेडिक तज्ज्ञ दिवंगत डॉ. जगदीश अग्रोया, डॉ. रामेश्वर कांदे यांच्या स्मरणार्थ एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ऑर्थोपेडिक विषयात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याची घोषणाही डॉ. अशोक पोद्दार व डॉ. संतोष माळी यांनी केली आहे. डॉ. अशोक पोद्दार व सचिव डॉ. संतोष माळी यांच्या कुशल नेतृत्वाखाली लातूर ऑर्थोपेडिक असो.ने केलेली नेत्रदीपक कामगिरी पाहूनच महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असो. लातूरला बेस्ट चॅप्टर अवॉर्ड तसेच बेस्ट महाराष्ट्र ऑर्थोपेडिक दिवस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार व सचिव डॉ. संतोष माळी यांनी इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नवीन ठक्कर, महाराष्ट्र ऑर्थो. असो.चे अध्यक्ष डॉ. कोठाडिया, सचिव डॉ. अभिजित वायगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑर्थोपेडिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. अग्रवाल, सचिव डॉ. प्रशांत भुतडा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्याने लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशनने हा पुरस्कार पटकावल्याचे सांगितले. ऑर्थोपेडिक क्षेत्रांतील वरिष्ठांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, शुभेच्छा यामुळे आम्हाला सर्वांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळाली आणि त्यातून संघटना सर्वोत्कृष्ट कार्य करू शकली. या पुरस्काराबद्दल या क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ मान्यवरांचे आपण आभार व्यक्त करतो, असेही डॉ. पोद्दार यांनी सांगितले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0