आनंदी शनिवार अंतर्गत दयानंद कला संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी दिली व्ही ट्युन्स म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओला भेट.
आनंदी शनिवार अंतर्गत दयानंद कला संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी दिली व्ही ट्युन्स म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओला भेट.
लातूर दि ५ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक शनिवारी हा ‘आनंदी शनिवार‘ म्हणून साजरा करावा असे म्हंटले आहे. प्रत्येक शनिवार ‘दप्तर विना‘ सुरू झाला आहे. दयानंद कला महाविद्यालयात प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ.अंजली जोशी,उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना आनंद अनुभूती द्यावी यासाठी प्रत्येक शनिवारी क्षेत्र भेट, कौशल्य विकास, व्यवसाय मार्गदर्शन, कथाकथन, काव्य वाचन, वक्तृत्व, नाट्य, योग, प्राणायाम, कला व क्रीडा आदि विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत दयानंद कला महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी व्ही ट्युन्स म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओला भेट दिली.
डॉ.संदीपान जगदाळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात व्ही ट्युन्स म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओचे संचालक विनायक राठोड यांनी इयत्ता आकरावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात संगीत संयोजन, गीतांना चाली लावणे, रेकॉर्डिंगचे तंत्र, साऊंड सिस्टीमची उपकरणे, म्युझिक एडिटिंगचे कौशल्य, साऊंड रेकॉर्डिंग मधील करिअरच्या संधी आदी विविध विषयावर सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले.
संगीत विभागात स्वागत समारंभ, निरोप समारंभ, छोट्या मैफलीचे आयोजन, वाद्य दुरुस्ती प्रशिक्षण, नॅपकिनपासून गुच्छ बनविणे, चित्र प्रदर्शन, साहित्यिकांची भेट, कलावंतांची संवाद, संगीत महोत्सवाचे आयोजन आदी विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमासाठी संगीत विभाग प्रमुख डॉ. कुलकर्णी, डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. शरद पाडे, प्रा. सोमनाथ पवार, प्रा. विजय मस्के हे परिश्रम घेत आहेत.
म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओला भेट उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अभिजीत पाटील, मयूर कांबळे, संकेत तेलंगे, यश शिंदे, ओंकार जाधव, पावन भांडेकर, कु.राविका वंगाटे, कु. स्नेहल जाधव, कु.साक्षी नान्नजकर, कु.राजनंदिनी पाटील, कु. पायल राठोड यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा,कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांनी अभिनंदन केले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0