दयानंद-कला-महाविद्यालयात-मराठी-अर्थशास्त्र-परिषदेचे-४७-वे-राष्ट्रीय-वार्षिक-अधिवेशन
दयानंद-कला-महाविद्यालयात-मराठी-अर्थशास्त्र-परिषदेचे-४७-वे-राष्ट्रीय-वार्षिक-अधिवेशन
लातूर: मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४७ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन दयानंद कला महाविद्यालयात ३०, ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी,२०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष तथा दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमण लाहोटी असून या परिषदेचे उद्घाटन पद्मभूषण मा. मेघनाद देसाई (प्रोफेसर, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तथा मेंबर, हाऊस ऑफ लॉर्ड ब्रिटिश पार्लमेंट) करणार आहेत. या परिषदेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. ना.श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री, लातूर जिल्हा), मा. आ. अमित देशमुख (आमदार लातूर शहर विधानसभा), लोकनेते मा. रामशेठ ठाकूर (माजी खासदार लोकसभा) व मा.आ.विक्रम काळे (शिक्षक आमदार मराठवाडा विभाग) उपस्थित असणार आहेत. तसेच या परिषदेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे मा. ना. बाबासाहेब पाटील (सहकारमंत्री महाराष्ट्र राज्य) व डॉ.मनोहर चासकर (कुलगुरू स्वा.रा.ती.म.विद्यापीठ,नांदेड) असणार आहेत. तसेच श्री.ललितभाई शाह ( उपाध्यक्ष दयानंद शिक्षण संस्था, लातूर) , श्री. रमेश बियाणी (सचिव दयानंद शिक्षण संस्था, लातूर), डॉ. अविनाश निकम (कार्याध्यक्ष मराठी अर्थशास्त्र परिषद) डॉ.मारुती तेगमपुरे (कार्यवाह खजिनदार मराठी अर्थशास्त्र परिषद) डॉ.राहुल म्होपरे (संपादक मराठी अर्थशास्त्र परिषद), डॉ.पी.ए.खडके (अधिष्ठधाता मानव्यविद्या शाखा स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड) प्राचार्य के.के.पाटील (पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालय शिरसाळा) प्रा.डॉ. लक्ष्मण पाटील (अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड) यांचे प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या अधिवेशनात चर्चेसाठी तीन सत्रात २०१५ पासूनच्या अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पारितोषिक प्राप्त अर्थतज्ज्ञाचे आर्थिक विचार, भारताच्या वित्तीय क्षेत्रातील बदलत्या आकृतीबंधाचा अभ्यास आणि महाराष्ट्रातील शैक्षणिक व आरोग्य विषयक आर्थिक धोरण या विषयावरील चर्चा - सेमिनार आयोजित करण्यात येणार आहेत.
मराठी अर्थशास्त्र परिषदेचे ४७ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनामध्ये एकूण २०४१ आजीव सभासद असून मराठी अर्थशास्त्र परिषदेचे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यात आजीव सभासद आहेत.
मराठी अर्थशास्त्र परिषदेचा मुख्य उद्देश मराठीभाषेतून अर्थशास्त्रातील संशोधन, चिंतन, लेखन वाचन वाढावे. अर्थशास्त्राची मराठीतून दर्जेदार ग्रंथ व पुस्तक निर्मिती व्हावी शिवाय चालू आर्थिक घडामोडी बाबत विचारमंथन करून त्यातून समाजाला योग्य दिशा मिळावी या दृष्टीने या परिषदेच्या वतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत मराठी अर्थशास्त्र परिषदेची ४६ अधिवेशने संपन्न झालेली आहेत. हे ४७ वे राष्ट्रीय अधिवेशन मान दयानंद कला महाविद्यालयाला मिळाला असून या अधवेशनाच्या चर्चासत्रामध्ये विविध विषयावर विचार मंथन होणार असून राज्यभरातील सर्व अर्थतज्ञ प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. लातूरकरांसाठी ही अर्थशास्त्र परिषद पर्वणीच ठरणार आहे अशी माहिती या परिषदेचे स्थानिक कार्याध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख व स्थानिक कार्यवाहक डॉ. बालाजी घुटे, डॉ. स्वप्नजा पाठक व कार्यालयीन अधिक्षक श्री. संजय व्यास यांनी दिली.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0