एकोप्याने गावाचा सर्वांगीण विकास शक्य - बालाजी थोटवे
एकोप्याने गावाचा सर्वांगीण विकास शक्य - बालाजी थोटवे
नांदेड - संविधानामुळे सर्वजण एकत्रित येऊन गुण्यागोविंदाने वावरत आहेत या संविधानामुळे आपला देश विविधतेने नटलेला आहे. प्रत्येकाच्या जीवनात या संविधानाचे महत्त्व खूप मोठे आहे. संविधान हा भारताचा अभिमान आहे. आपण सर्वच प्रकारचे भेद बाजूला ठेवून एकत्र आलो तर एकोप्यानेच गावाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे प्रतिपादन येथील भारतीय संविधान चळवळीचे अभ्यासक बालाजी थोटवे यांनी केले. ते निमगाव येथील राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे, एस.एन. बट्टेवाड, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक जी. पी. सुर्यवंशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर घोरपडे, भारतीय जवान गोविंद सोळंके, चेअरमन गजानन जगताप, संजय घोरपडे, पांडुरंग झुडपे, संतोष घोरपडे, विजय घोरपडे, राजू सोगे, रवी तेली, संदीप सोळंके, अंकुश मोलके, बापू मोलके, गंगाधर घोरपडे, नानासाहेब घोरपडे, शिवाजी भिसे, बळवंत घोरपडे विलास घोरपडे आदींची उपस्थिती होती.
येथील युवा प्रबोधन मंच आणि सत्यशोधक समाज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागर महा व्याख्यानमाला ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. निमगाव ता. अर्धापूर येथे जिजामाता जयंती मंडळाच्या वतीने या व्याख्यानमालेचे पहिले व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या सत्कारानंतर व्याख्यानास प्रारंभ झाला. त्यानंतर मुख्याध्यापक जी.पी. सुर्यवंशी आणि वक्ते प्रज्ञाधर ढवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कल्याणी गलांडे, गंगामाई जगताप या विद्यार्थ्यांनीनीही जयंतीच्या औचित्याने भाषण केले. बालाजी थोटवे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी भिसे यांनी केले. प्रास्ताविक बळवंत घोरपडे यांनी तर प्रशांत जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह युवा व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0