डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीची जय्यत तयारी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीची जय्यत तयारी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीची जय्यत तयारी.
लातूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त संविधान चौक, बार्शी रोड, लातूर येथे महाराष्ट्रातील पहिल्या 40 फूट उंच LED बॅनरचे अनावरण करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन रोहित भालेराव RB ग्रुप व निखिल शिवाजी गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले. रिलस्टार दिव्याताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्तिथीत आपले विचार व्यक्त करताना की तुम्ही शिकत आहात तर तुम्ही बाबासाहेबांना मानवंदना देत आहेत. बाबासाहेबांचा एकही चुकीचा मायनस पॉईंट सापडत नाही. “शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा” कसल्यसाही प्रकारचा अन्याय सहन करायचा नाही. अशी प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून मिळते.
मला जन्माला यायच असत तर बाबासाहेबांनी हात लावलेले पुस्तक म्हणून येईन, माझा बाप दमुन कष्ट करुन झाडाखाली बसतो सावलीला ती सावली म्हणून येईन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोटचे बटन म्हणून येईन, डॉ. बाबासाहेबांनी केलेल्या कष्टाचा घाम म्हणून येईन, मी जन्माला येईल तर रमाईचा पदर म्हणून येईन, या पदराचे कफन आपल्या त्या चार पोरांसाठी केल, मी जन्माला येईल तर बाबासाहेबांची लेक व वाघीण म्हणून येईन, हा जन्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी समर्पित.
डॉ. बाबासाहेबासाठी आंबेडकरवादी विचारधारेचे लोक एका धर्माचे नसून ते सर्व धर्मातील आहेत. आंबेडकर हे नाव नसून ती एक विचारधारा आहे ती कधी मरणार नाही आणि आम्ही मरु सुद्धा देणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वाघ म्हणून जन्माला येईल नाहीतर अशा जीवणावर लाथ मारेण.
याप्रसंगी धम्मगुरु भिक्खू पय्यानंदजी थेरो यांनी काही लोक म्हणतात की आम्हाला घमंड आहे कारण आमच्याकडे ज्ञान आहे. “घमंड है जो ग्यान का प्रमाण ये विद्वाण का, ये मात को बुध्द जो ग्यानी था ब्रम्हांड का” असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी कीर्ती डिजिटल, के. के. इव्हेंट्स यांच्या पुढाकाराने कार्यक्रम संपन्न झाला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0