तीर्थक्षेत्र योजनेतील विकासकामे गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार करावीत आ. रमेशआप्पा कराड यांच्या सूचना
तीर्थक्षेत्र योजनेतील विकासकामे गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार करावीत आ. रमेशआप्पा कराड यांच्या सूचना
तीर्थक्षेत्र योजनेतील विकासकामे गुणवत्तापूर्वक आणि
दर्जेदार करावीत आ. रमेशआप्पा कराड यांच्या सूचना
निवळी, गातेगाव येथील कामाची पाहणी आणि ग्रामस्थांशी संवाद
लातूर दि.११- लातूर तालुक्यातील मौजे निवळी, गातेगाव बोरगाव काळे येथील विविध विकास कामाची पाहणी करून लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी शुक्रवारी आढावा घेतला. सर्व विकासकामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी शुक्रवारी सकाळी लातूर तालुक्यातील मौजे निवळी येथील श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर परिसरात भक्तनिवास, परिसरातील रस्ते, विद्युतीकरण आणि मौजे गातेगाव येथील श्री राधाकृष्ण मंदिर आश्रम परिसरात भक्तनिवास सभामंडप संरक्षण भिंत यासह विविध कामासाठी राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून विविध प्रश्नांची सोडवणूक केली. याप्रसंगी परमपूज्य विद्यानंदजी सागर महाराज, लातूर चे तहसीलदार सौदागर तांदळे, तालुका कृषी अधिकारी राऊत, जिप बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती मोतीपवळे, वीज वितरण मंडळाचे उप अभियंता शेंडे, पोलीस अधिकारी उजगरे, यांच्यासह भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, ओबीसी मोर्चाचे भागवत सोट, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नाथसिंह देशमुख, तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, संगायोचे तालुकाध्यक्ष वैभव सापसोड, जिल्हा भाजपाचे विजय काळे, सुरज शिंदे, सरपंच अभय सोनपेठकर, गातेगाव सरपंच नागनाथ बनसोडे, उपसरपंच ज्ञानेश्वर जुगल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिर परिसरात होत असलेल्या विकास कामामुळे भाविकांना सोयी सुविधा मिळणार असल्याचे सांगून ग्रामस्थांशी संवाद साधताना आ. रमेशआप्पा कराड यांनी या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी शेत रस्ते, पांदण रस्ते, सिंगल फेस डीपी, शेतीची २४ तास लाईट, पीकविमा, किसान सन्मान योजना, घरकुल यासह विविध प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले असता गरजू आणि पात्र एकही लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे बोलून दाखवले.
मौजे बोरगाव काळे येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर आणि ज्योतिबा मंदिर या देवस्थानांना भेटी देऊन आ. रमेशआप्पा कराड यांनी कामांची पाहणी केली. तत्पूर्वी बोरगाव काळे येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. विकास कामाची पाहणी आणि ग्रामस्थांशी संवाद दौऱ्याच्या निमित्ताने निवळी आणि गातेगाव येथील ग्रामस्थांनी आ. रमेशआप्पा कराड यांचा यथोचित सत्कार करून स्वागत केले.
यावेळी भाजपाचे प्रताप पाटील, विश्वास कावळे, गोपाळ पाटील, अशोक सावंत, विनायक मगर, आदिनाथ मुळे, काशिनाथ ढगे, शिवाजी अडसूळ, धनंजय जाधव, मल्हारी शिरसाट, बालाजी दुटाळ, बालाजी नाईकवाडे, राजाभाऊ शिंदे, गुणवंत पांचाळ, ज्योतीराम शिनगारे, शिवाजी जाधव, उद्धव रसाळ, दादा मायंदे, अर्जुन मांयदे, बाबासाहेब भिसे, काकासाहेब साखरे, सचिन लटपटे, बाळासाहेब कदम, प्रशांत शिंदे, राजाभाऊ ढोणे, नितीन पोतदार,शिवरुद्र चौंडे, राजाभाऊ डोंबे, दीपक बनसोडे, प्रदीप काळे,अमित जावळे यांच्यासह त्या त्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0