एकूण १९ जणांचे रक्तदान,४५ जणांची आरोग्य तपासणी व मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन
एकूण १९ जणांचे रक्तदान,४५ जणांची आरोग्य तपासणी व मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन
लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दि.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी ' रक्तदान,नेत्रदान जनजागृती आणि आरोग्य तपासणी शिबिरा ' चे आयोजन करण्यात आलेले होते.
सदरील शिबिरात आरोग्य तपासणी करताना हिमोग्लोबिन,कोलेस्टेरॉल,शुगर,व्हिटामिन,रक्तदाब इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.तसेच एकूण १९ जणांनी रक्तदान केले आणि एकूण ४५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी राष्ट्रीय छात्र सेना व रासेयो स्वयंसेवक,प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी आरोग्य तपासणी,रक्तदान तसेच मरणोत्तर नेत्रदान करावे व नेत्रदान करण्यासाठी समाजजीवनात जनजागृतीही करावी,असे आवाहनही केले.
याप्रसंगी डॉ.भालचंद्र ब्लड बँक,लातूरचे डॉ.योगेश गवसाने,डॉ.शुभांगी धुमुरे, जनसंपर्क अधिकारी किशोर पवार,सौ.रेखा गवळी,सौ.गायत्री इगवे,नितिन क्षीरसागर तसेच डॉक्टर लाल पॅथ लॅब्स,लातूरचे इरफान सय्यद,आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पाटील आणि प्रा.डॉ.श्याम इबाते,प्रा.बळवंत सूर्यवंशी,रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.सुरज कोल्हे,डॉ.अमोल ठोसर,राष्ट्रीय छात्र सेना कॅप्टन विजेंद्र चौधरी यांची प्रमुख उपस्थित होती.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0