जवळा दे. येथे हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त अभिनव उपक्रम; माता- पालक मेळाव्याचेही शाळेत आयोजन
जवळा दे. येथे हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त अभिनव उपक्रम; माता- पालक मेळाव्याचेही शाळेत आयोजन
नांदेड - भारतीय संस्कृतीप्रमाणे मकर संक्रांतीच्या पावन पर्वात रथसप्तमीपर्यंत ठिकठिकाणी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचे औचित्य साधून जवळा दे. येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गुरुजींनी अनोखी शक्कल लढवित हळदी कुंकू कार्यक्रमाचे निमित्ताने शाळेतील माता पालकांचा पालक मेळावा आयोजित केला. यानिमित्ताने वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी महिलांना वाचनीय अशा पुस्तकांचे वाण म्हणून भेट देण्यात आले. यात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महानायिका, अहिल्याबाई होळकर, संतांचे विचार, महात्मा फुले अशा विविध पुस्तकांचा समावेश आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माता पालक संघाच्या अध्यक्षा मनीषा गच्चे ह्या होत्या तर माजी सरपंच कमलबाई शिखरे, सुषमा गच्चे, सत्यशिला सावंत, प्रतिभा गोडबोले, मिरा कांबळे, सुमित्रा शिखरे, कुशावर्ता शिखरे, कविता मठपती, सरिता गच्चे, उषा मठपती, रुपाली हटकर, सुलोचना गच्चे या माता पालकांसह अनेक मातांची यावेळी उपस्थिती होती.
हळदी कुंकू कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे आणि सहशिक्षक संतोष घटकार यांनी अनोखी शक्कल लढवित माता पालकांना वस्तूरुपी वाणाच्या ऐवजी पुस्तकांचे वाण भेट दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या वतीने मनिषा गच्चे यांनी महिलांना तिळगुळ दिले. महिलांनी एकमेकांचे हळदी कुंकवांनी औक्षण करून आपल्या सौभाग्याविषयी मंगल कामना व्यक्त केल्या. तसेच आपल्या पाल्यांच्या शालेय गुणवत्तेबरोबरच इतर विषयांवर साधक बाधक चर्चा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी शिखरे यांनी केले तर आभार मयुरी गोडबोले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गीतांजली गोडबोले, किरण कदम, तेजल शिखरे, सुप्रिया गच्चे, अनन्या टिमके, अक्षरा शिखरे, गोडबोले, कल्याणी शिखरे, कावेरी गच्चे, शालीनी हटकर, सुहानी कांबळे यांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0