माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची मागणी.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची मागणी.
राज्याच्या पणन मंत्र्याची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन केले सादर
लातूर प्रतिनिधी : बुधवार दि. २२ जानेवारी २०२५
लातूर हे कृषी प्रधान असून येथील कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील एक
प्रमुख बाजार समिती आहे. मात्र, सध्याच्या बाजार समितीची क्षमता अपुरी
पडत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नवीन आधुनिक
मार्केट यार्ड उभारण्याची गरज आहे. याकरीता लातूरच्या एमआयडीसी परिसरातील
मंजूर असलेल्या भूखंडावर नवीन अद्ययावत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे
मार्केट यार्ड असावे, तसेच याठिकाणी फळे, फुले, भाजीपाला व शेतकऱ्यांच्या
इतर कृषी माल निर्यातीच्या सुविधा उभारणीसाठी राज्याचे माजी वैद्यकीय
शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख
यांनी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची मंगळवार
दि. २१ जानेवारी २५ रोजी मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली.
यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पणन मंत्री जयकुमार
रावल यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच एमआयडीसी
परिसरात मंजूर भूखंडावर नवीन मार्केट यार्ड उभारणी बाबत, कृषी उत्पन्न
बाजार समितीची नवीन नियमावली, कृषीमाल निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या
संधी, अद्यावत कृषी तंत्रज्ञानाचा वापर या अन्य विविध विषयांवर चर्चा
केली. दरम्यान लातुरातील नवीन मार्केट यार्डची उभारणी व तेथे
शेतकऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी
सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार
रावल यांनी याप्रसंगी दिले.
लातूर या ठिकाणी राज्यातील नामवंत अशी कृषी मालाची बाजारपेठ आहे. येथील
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीही तेवढीच सक्षम असून, बाजार समितीकडे
कोणत्याही प्रकारचे थकीत कर्ज नाही. त्यामुळे बाजार समितीच्या वतीने
शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी व उत्पादनाचा दर्जा
सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व कृषी विषयक सोयी सुविधा पुरवण्यास
बाजार समितीला परवानगी द्यावी, बाजारसमित्या या शेतकऱ्यांच्या हिताची
जपणूक करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या
गुणवंत मुलांना अद्यावत शैक्षणिक साहित्य म्हणून टॅब, त्याचबरोबर
शेतीमालाची जपणूक करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर ताडपत्री वाटप
करण्यास परवानगी मिळावी, नवीन वाहन खरेदीस परवानगी देण्यात यावी यासह इतर
मागण्या यावेळी त्यांच्याकडून करण्यात आल्या.
यावेळी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे
यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0