भ्रष्ट अव्वल कारकूनाला तात्काळ निलंबित करण्यासाठी शिवसेनेचे हालगी नाद करून धरणे आंदोलन
भ्रष्ट अव्वल कारकूनाला तात्काळ निलंबित करण्यासाठी शिवसेनेचे हालगी नाद करून धरणे आंदोलन
लातूर : लातूर येथील उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून मुजावर यांना
तात्काळ निलंबीत करण्यात यावे तसेच त्यांच्या पुर्ण प्रॉपर्टीचीही सखोल
चौकशी करण्यात यावी, असे अनेकवेळा निवेदने देऊनही कार्यवाही होत नाही.
अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधियमानुसार
दंडात्मक कार्यवाहीचे आदेश उपजिल्हाधिकारी यांना असताना ते कोणतीच
कार्यवाही करत नाही, त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे लातूर तालुका प्रमुख
रमेश पाटील यांच्या नेतृत्वात 5 मार्च रोजी लातूर उपविभागीय
कार्यालयासमोर हालगी नाद वं धरणे आंदोलन करण्यात आले.
लातूरच्या उपविभागीय कार्यालयात सदरचा अव्वल कारकून मुजावर हा किती
दिवसापासून उपविभागीय कार्यालयात रुजु आहे यांची सखोल चौकशी करण्यात यावी
व त्याचा सी.डी.आर तपासण्यात यावा. त्यांच्या कार्यकाळात गुंठेवारीत ही
लाखो रुपये घेतल्याशिवाय
हे गुंठेवारी फाईल मंजूर करीत नाहीत, सदर महसूल मधील अनाधिकृत गौणखनिज
मध्ये प्रचंड
भ्रष्टाचार चालू आहे व वाहतूक करीत असणारे टिप्पर व हायवा पकडल्यानंतर हे
जे टिप्पर मालक पैसे देतात त्यांना एक लाख रुपये दंड करतात व पैसे
देण्यास नकार दिल्यास रिकाम्या गाडयावर मनमानी दंडात्मक कार्यवाही करतात.
शासन निर्णयाची ते पायमल्ली करतात. अशा अव्वल कारकूनास तात्काळ निलंबित
करावे. यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लातूर तालुका प्रमुख रमेश पाटील
यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयासमोर हालगी नाद वं धरणे आंदोलन
सुरु केले आहे. या आंदोलनात विनोद गुडे कव्हेकर, चंद्रकांत पाटील, किशोर
जाधव, रणजित मस्के, ओम भालेराव, मुक्तेश्वर जाधव, करण कांबळे, भैरव
सूर्यवंशी, अजय बोयने, महेश सूर्यवंशी, ऋषिकेश शिंदे, प्रणव शिंदे,
जनार्दन शिंदे, भीष्मचार्य कांबळे, तुकाराम शिंदे, मुकेश जाधव, खंडू
शिंदे, विष्णू मोरे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0