साहित्य संमेलनात रंगली ९२ वी काव्यपौर्णिमा; पाचवे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन
साहित्य संमेलनात रंगली ९२ वी काव्यपौर्णिमा; पाचवे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन
नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित असलेल्या सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पाचव्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात ज्येष्ठ कवींसह नवोदितांनी शिवकालीन आठवणी जाग्या करीत शिव विचारांचा आणि मराठी मायबोलीचा जागर घडवून आणला. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या ९२ व्या काव्यपौर्णिमा म्हणजे कविसंमेलनाच्या या सत्रात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी गजानन हिंगमिरे होते तर अतिथी कवी म्हणून बी. जी. कळसे आणि रुचिरा बेटकर यांची उपस्थिती होती. तसेच सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, महिला विभाग प्रमुख रुपाली वागरे वैद्य, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, सचिव चंद्रकांत कदम, स्वागताध्यक्ष सतिश पाटील मातुळकर, निमंत्रक बालाजी सूर्यतळे, प्रकाश कदम, मुख्य संयोजक दत्ताहरी कदम आदींची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळ आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती मातुळच्या संयुक्त विद्यमाने भोकर तालुक्यातील मातुळ गावी पाचवे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. शेवटच्या सत्रात कविसंमेलन संपन्न झाले. कविसंमेलनाचे अध्यक्ष गजानन हिंगमिरे यांनी आपली रचना सादर करुन कविसंमेलनाला परवानगी दिली. त्यानंतर सहभागी झालेल्या कवी कवयित्रींनी शिव विचारांचा आणि मराठी मायबोलीचा जागर घडवून आणला. यात प्रल्हाद घोरबांड, सुमेध घुगरे, ज्योती परांजपे, प्रतिभा पांडे, भारत सुर्यवंशी, सुभाष शिंगणकर, मारोती काळबांडे, जी. एस. भालेराव, डी. एन. मोरे, जीवन मांजरमकर, अल्का मुगटकर, राजू सावतकर, दगडूजी घुगरे, शिरीषकुमार लोणकर, विक्तुदास होट्टे, ओमप्रकाश मस्के, रुपाली वागरे, जयसिंग चव्हाण, एस. के. दवणे, पांडुरंग कोकुलवार, नागोराव डोंगरे, प्रज्ञाधर ढवळे, अनुरत्न वाघमारे, रणजित गोणारकर, शंकर गच्चे, डी. एन. घायाळ, राजेंद्र उपाध्याय यांनी सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन अनुरत्न वाघमारे यांनी केले तर आभार उपसरपंच माधव बोईनवाड यांनी मानले. शेवटच्या सत्रातही रसिक प्रेक्षकांची संख्या लक्षणीय होती. साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळाचे पदाधिकारी आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0