*क्विज आणि मॅथ मॉडेल मेकिंग साठी शालेय विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद*
*क्विज आणि मॅथ मॉडेल मेकिंग साठी शालेय विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद*
*शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित क्विझ आणि मॅथ मॉडेल मेकिंग जिल्हास्तरीय स्पर्धा दयानंद विज्ञानमध्ये संपन्न*
*प्रश्नमंजुषा स्पर्धेतील पहिले दोन संघ व पहिल्या पाच मॉडेलमधील विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावर अंतिम फेरीसाठी निवड*
*जिल्ह्यातील विविध शाळांतून क्विज स्पर्धेसाठी 56 विद्यार्थ्यांसह 14 संघ तर मॅथ मॉडेल मेकिंग स्पर्धेसाठी 58 विद्यार्थ्यांसह 31 मॉडेल सहभागी*
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथील गणितशास्ञ संकुल आणि लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील गणित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या क्विज आणि मॅथ मॉडेल मेकिंग स्पर्धेची जिल्हास्तरीय निवड फेरी दि.28 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाली.या स्पर्धेचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव रमेश बियाणी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे, प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड,बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य रवींद्र राजेगावकर,उपप्राचार्य प्रा.भाऊसाहेब सरवदे, पर्यवेक्षिका डॉ.वैशाली पाटील, डॉ.संध्या कोल्हे,डॉ.युवराज सारणीकर,डॉ.चंद्रशेखर स्वामी, डॉ.जमन अनगुलवार, डॉ.विश्वनाथ मोटे,प्रा.बळवंत सूर्यवंशी तसेच इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
सदरील स्पर्धेत पोद्दार इंटरनॅशनल स्कुल,लातूर,ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र,लातूर
आणि देशीकेंद्र विद्यालय,लातूर या संघांनी जिल्हास्तरीय क्विज स्पर्धेत अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला तर मॅथ मॉडेल मेकिंग स्पर्धेत संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुलच्या पलंगे ओजसने प्रथम क्रमांक,सरस्वती विद्यालय लातूरच्या डोंगे श्रिया,सराफ प्राची यांनी द्वितीय,श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या मरे अथर्व,कटारे अर्थव यांनी तृतीय,स्टीम एज्युकेशन सेंटर लातूरच्या कुलकर्णी योगेश,बिसेन सानवी यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला,तर पंचम क्रमांकाचे पारितोषिक साने गुरुजी विद्यालय आणि ज्ञानसागर इंग्लिश अँड पब्लिक स्कुल लातूरला विभागून देण्यात आले.क्विज आणि मॉडेल मेकिंग स्पर्धेत पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आणि क्विजमधील पहिले दोन संघ आणि पहिल्या पाच मॉडेलमधील विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावर अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने क्विज स्पर्धेसाठी पहिल्या तीन संघास रोख रक्कम 1100, 700 आणि 500 आणि प्रशस्तीपत्र तर मॅथ मॉडेल मेकिंग स्पर्धेसाठी पहिल्या तीन मॉडेलला रोख 2100, 1100 आणि 700 आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांतून क्विज स्पर्धेसाठी 56 विद्यार्थ्यांसह 14 संघ तर मॅथ मॉडेल मेकिंग स्पर्धेसाठी 58 विद्यार्थ्यांसह 31 मॉडेल सहभागी झाले होते.मॅथ मॉडेल मेकिंग स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य रवींद्र राजेगावकर आणि डॉ.विश्वनाथ मोटे यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांच्यासह सर्वांनी आपल्या मार्गदर्शनातून ' ज्यांना गणित जमते,त्यांच्या आयुष्याचे गणित कधीही चुकत नाही ' असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी व आवड निर्माण केली.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोपप्रसंगी डॉ.रोहिणी शिंदे,डॉ.रवी सोळुंके,डॉ.विजेंद्र चौधरी,डॉ.आण्णाराव चौघुले,डॉ.रामशेट्टी शेटकार यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पवन भोसले यांनी
केले तर आभार प्रा.दीपक धावारे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.ऐश्वर्या अंधारे यांनी केले.शालेय विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या मार्गदर्शकांनी मनोगत व्यक्त करत आपले अनुभव सांगितले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक गणित विभागाचे प्रा.सुरेंद्र स्वामी,प्रा.पवन भोसले,प्रा.दीपक धावारे,प्रा.किरण चव्हाण,प्रा.ऐश्वर्या अंधारे,प्रा.प्रियंका पाटील,प्रा.अशोक शिरे,प्रा.अश्विन कांबळे,राजेसाहेब पांचाळ,मनोज शिंदे व गणित विषयाचे विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0