महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ॲड. राजेंद्र लातूरकर यांचा सत्कार संपन्न
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ॲड. राजेंद्र लातूरकर यांचा सत्कार संपन्न
लातूर (दि.०५ एप्रिल)
लातूर जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ, फर्डे वक्ते, कवी आणि लेखक, सुप्रसिद्ध विचारवंत तथा आंबेडकरी चळवळीतील नैष्ठिक अनुयायी अॅड. राजेंद्र लातूरकर यांचा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॅा. संजय गवई यांच्या हस्ते ते महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे सन १९७७-७८ मधील माजी विद्यार्थी असल्यामुळे महाविद्यालयासाठी ही विशेष गौरवाची गोष्ट असल्यामुळे त्यांचा शाल, लेखनी आणि पुष्प देऊन व पेढा भरवून यथोचित सहृद्य सत्कार करण्यात आला.
ॲड. राजेंद्र लातूरकर हे सन १९७७-७८ या शैक्षणिक वर्षात ४८ वर्षांपूर्वी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात इयत्ता ११वीच्या विज्ञान शाखेत विद्यार्थी म्हणून अध्ययन करीत होते. तेव्हा त्यांनी महाविद्यालयातील नवोदित कवी- लेखकांचे साहित्य प्रकाशित व्हावे म्हणून “अंतरंग” हे हस्तलिखित भित्तिपत्रकही चालवले होते. पुढील काळात त्यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयातून कला स्नातक, तर दयानंद कला महाविद्यालयातून स्नातकोत्तर कला या पदव्या संपादन केल्या. त्यांनी “डॅा. गंगाधर पानतावणे: मानस आणि तत्त्वविचार” या विषयावर प्रबंधलेखनही केले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेतील पदविका व दुस-यांदा मराठीतील स्नातकोत्तर पदवी संपादन केली, हे विशेष होय.
सन २०१२ ते २०१७ या कालखंडात त्यांनी दयानंद विधी महाविद्यालयातून एल.एल. बी. आणि एल. एल. एम. या पदव्या उच्चतम गुणांनी संपादन केल्या असून ते आपल्या संपादित ज्ञानाचा उपयोग समाजजागृती आणि समाजबांधवांना विधीसेवा देण्यासाठी करीत आहेत.
ॲड. राजेंद्र लातूरकर हे ३० वर्षांच्या अध्यापनाच्या सेवेतून केशवराज विद्यालयातून सन २०१५ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. सन २०२४-२५ मध्ये त्यांनी ६८ व्या वर्षात पदार्पण केले असले तरी त्यांचे विद्यार्थी म्हणून पुढील शिक्षण अखंडपणे चालूच आहे. विद्यमान शैक्षणिक वर्षात ते डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादेत स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयातून “पाली ॲण्ड बुद्धिज्झम” या विभागातून पाली विषयातील स्नातकोत्तर पदवी संपादन करण्यासाठी विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत आहेत. डॅा. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाद्वारा जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या प्रथम सत्र परीक्षेत त्यांनी ८७.५० % गुण संपादन केले आहेत, ही विशेष अभिनंदनीय गोष्ट आहे. त्यांनी आपल्या पाली विषयाच्या अध्ययनासाठी राजर्षी शाहू महाविद्यालय आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील ग्रंथ भांडाराचा उपयोग केल्याचे स्पष्टोद्गार काढले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0