डॉ. विशाल नागदेव यांचे मत; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात ई - संसाधने कार्यशाळा
डॉ. विशाल नागदेव यांचे मत; एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात ई - संसाधने कार्यशाळा
लातूर, दि. २७ - सध्याची बदलती जीवनशैली आणि दंत रोगांमधील गुंतागुंत पाहता या विषयात नवनवीन संशोधने होणे गरजेचे आहे. दंत वैद्यकीय शाखेतील संशोधनासाठी ई - स्वरुपातील माहिती उपयुक्त असून ऑनलाईन स्वरुपातील उपलब्ध माहिती विद्यार्थी व संशोधकांनी अभ्यासावी, असे प्रतिपादन इल्सविएर प्रकाशनाचे प्रतिनिधी डॉ. विशाल नागदेव यांनी केले.
एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व इल्सविएर प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी 'ई - संसाधने शोध आणि जतन' या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विशाल नागदेव हे बोलत होते. यावेळी उप प्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी, ग्रंथालय विभाग प्रमुख ज्ञानोबा केंद्रे हे उपस्थित होते.
दंत वैद्यकीय शाखेत सध्या स्थितीत उपलब्ध असलेल्या विविध विषयावरील ई - बुक्स, जर्नल्स, क्लीनिकल ओव्हरयुज, क्लिनिकल ट्रायल्स, ड्रग्स मोनोग्राफ, क्लीनिकल कॅल्क्युलेटर, क्लीनिकल फोकस, मल्टीमीडिया, प्रोसिजर व्हिडिओज ही ई - साधने इंटरनेटवर मोठ्या स्वरूपात उपलब्ध आहेत. या उपलब्ध संसाधनांचा शोध आणि जतन करुन योग्य व्यवस्थापन करुन त्याचा संशोधनासाठी उपयोग करावा, असे सांगून यावेळी पुढे बोलताना डॉ. विशाल नागदेव म्हणाले की, दंत शाखेतील जगभरातील उपलब्ध माहिती मिळविण्यासाठी इंटरनेटचे दालन उघडे आहे. सध्या स्थितीत डिजिटलायझेशन च्या जमान्यात मुद्रित स्वरूपात माहिती उपलब्ध होण्यामध्ये मर्यादा येत आहेत.
त्यामुळे आपल्याकडील उपलब्ध डिजिटल उपकरणांचा वापर अभ्यासासाठी व संशोधनासाठी करणे गरजेचे आहे. यासाठी जगभरातील अनेक नामांकित प्रकाशनांनी दंत वैद्यकीय शाखेतील माहितीचा संग्रह एकत्रित करुन तो संकेतस्थळांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिलेला आहे. संशोधनासाठी आवश्यक माहितीचा शोध घेऊन त्याचे ई - स्वरुपात जतन करणे गरजेचे आहे. जेणेकरुन आपल्याला हव्या त्या वेळी हा माहिती संग्रह अभ्यासता येईल, असे डॉ. नागदेव यांनी सांगितले.
यावेळी डॉ. यतीशकुमार जोशी यांचेही उपस्थितांना मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानोबा केंद्रे यांनी करुन शेवटी आभार मानले. या कार्यशाळेसाठी एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील प्राध्यापक व बी.डी.एस., एम.डी.एस. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0