*दयानंद विज्ञान महाविद्यालयास इस्रोचे नोडल सेंटर म्हणून मान्यता*
*दयानंद विज्ञान महाविद्यालयास इस्रोचे नोडल सेंटर म्हणून मान्यता*
लातूर : दयानंद शिक्षण संस्था संचलित,दयानंद विज्ञान महाविद्यालयास इस्रो अंतर्गत इंडियन इंस्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग देहरादूनमार्फत विविध विषयावर आधारित अभ्यासक्रम ऑनलाईन व ऑफलाईन चालवले जातात.
सदरील केंद्रामार्फत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अट नसून कुठलाही विद्यार्थी,प्राध्यापक अथवा शिक्षक अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतो.दयानंद शिक्षण संस्थेने अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले असून आता ह्या केंद्रास मिळालेली मान्यता ही विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार विविध विषयावर शिक्षण घेण्याची संधी प्राप्त करून देईल,असा विश्वास दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी व्यक्त केला.तसेच विद्यार्थ्यांच्या आंतरिक गुणांना वाव मिळावा व त्यातून विद्यार्थी एक सुजाण नागरिक बनावा त्याबाबत संस्था नेहमीच आग्रही राहिलेली आहे.
सदरील केंद्राची मान्यता ही लातूर जिल्ह्यासाठी एक विशेष बाब होय,असे मत संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी व्यक्त केले.
इस्रोमार्फत मान्यता प्राप्त झालेले दयानंद विज्ञान महाविद्यालयातील असे केंद्र हे मराठवाड्यातील एकमेव केंद्र असून ह्याचा लाभ जास्तीत- जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा,असे आवाहन दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे ह्यांनी विद्यार्थ्यांना केले.ह्या केंद्रासाठी नोडल ऑफिसर म्हणून संस्थेचे ट्रेनिंग एंड प्लेसमेंट ऑफिसर राहुल आठवले ह्यांची निवड केली असून,विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन इस्रो व अनेक नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होण्यासाठी अशा वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्याना नक्की होईल असा विश्वास नवनियुक्त नोडल ऑफिसर राहुल आठवले ह्यांनी व्यक्त केला.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0