मुख्याध्यापकांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन स्थगित
मुख्याध्यापकांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन स्थगित
लातूर : अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणेच्या वतीने लातुरात दि. २८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय मुख्याध्यापकांचे ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या आकस्मिक निधनामुळे स्थगित करण्यात आल्याची माहिती लातूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपाध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी दिली. आता हे संमेलन येत्या दि. १० व ११ जानेवारी २०२५ रोजी होणं असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सदर शैक्षणिक संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संमेलनाची जय्यत तयारी झालेली असतानाच ही दुःखद घटना घडली. त्यामुळे सदर संमेलन स्थगित झाल्याची नोंद राज्यातील सर्व मुख्याध्यापकांनी घ्यावी. हे संमेलन आता दि. १० व ११ जानेवारी रोजी त्याच ठिकाणी म्हणजे थोरमोटे लॉन्स, औसा रोड, लातूर या ठिकाणी होणार असून त्या संमेलनास राज्यभरातील मुख्याध्यापक प्रतिनिधींनी आवर्जून उपस्थित रहावे ,असे आवाहनही
मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संयुक्त अध्यक्ष रावसाहेब आवारी, अध्यक्ष के.एस. मसे , कार्याध्यक्ष मोहन सोनवणे , राज्य उपाध्यक्ष नंदकुमार बारवकर, शत्रुघ्न बिरकड, अशोक मोरे, मराठवाडा अध्यक्ष संजय शिप्परकर , उपाध्यक्ष देविदास उमाटे, कांचन महाजन, नामदेव सोनवणे, सचिव जालिंदर पैठणे, विदर्भ अध्यक्ष सतीश जगताप, उपाध्यक्ष मंदा उमाटे, विनोद संगीतराव, सचिव विलास भारसाकळे, लातूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव बजरंग चोले , कोषाध्यक्ष शिवराज म्हेत्रे, प्रवक्ते कालिदास शेळके, उपाध्यक्ष रमेश मदरसे, सचिन साबणे, उमेश पाटील, श्रीमती जयश्री ढवळे , मार्गदर्शक दिलीप धुमाळ, धनराज चिद्रे , सुवर्णा जाधव, दत्तात्रय पारवे ,अनिल कारभारी, रामेश्वर कदम, बालाजी मुंडे, एस.व्ही. मादलापूरे, परवेजखान पठाण, विशाल पात्रे , जयश्री पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0