राज्याच्या औद्योगिक भरभराटीसाठी 'दावोस' महत्वाचे-हेमंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर राज्यात बडे उद्योग येण्याची शक्यता
राज्याच्या औद्योगिक भरभराटीसाठी 'दावोस' महत्वाचे-हेमंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर राज्यात बडे उद्योग येण्याची शक्यता
पुणे, २० जानेवारी २०२५
राज्याची आर्थिक स्थिती पुन्हा रूळावर आणण्यासाठी आणि औद्योगिक भरभराटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'दावोस' दौरा महत्वाचा असल्याचे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.२०) व्यक्त केले. या दौऱ्यानंतर राज्यात बडे उद्योग येण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या काळापासून सुरू असलेली आंदोलने आणि राजकीय प्रतिस्पर्धेमुळे महाराष्ट्राचा विकास मागे पडला आहे. आता स्थिर आणि बहुमतातील महायुती सरकार सत्तेत असल्यामुळे राज्याला वेगाने प्रगती करण्याची संधी आहे.अशातच मोठे उद्योग दावोस बैठकीनंतर राज्यात आले तर, युवकांच्या हाती रोजगार मिळतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.बेरोजगार तरूणांसाठी कौशल्य विकास योजनेवर सरकारने अधिक भर देण्याची गरज देखील पाटील यांनी बोलून दाखवली.
गतवर्षी २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस समिट मध्ये जवळपास ३ लाख ५३ हजार कोटीचे सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केली होती. पंरतु, एमओयू नंतर प्रत्यक्ष किती हजार कोटींची थेट गुंतवणूक झाली, याची माहिती अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात राज्याने औद्योगिकीकरण्याच्या पातळीवर चांगली प्रगती केली होती. फडणवीसांनी दोन वेळा 'मॅग्नेटिक महाराष्ट्राचे' आयोजन करीत गुंतवणुकदारांना राज्यात गुंतवणुकीसाठी आकर्षित केले होते.त्यांच्या कारर्किदीत औद्योगिक विकासात महाराष्ट्रत पाचव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आला होते.
मधल्या काळात बडे उद्योग दुसऱ्या राजयात गेल्याने राज्याच्या प्रतिष्टेवर नकारात्मक प्रभाव पडला होता.आता नव्याने राज्याला औद्योगिक गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांसमोर उभे असल्याचे पाटील म्हणाले. डेटा सेंटर, ऑटोमोबाईल, सेमीकंटक्टर, ईलेक्ट्रानिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, इस्पात, अन्न प्रक्रिया, कपडे, फार्मास्यूटिकल्न्स तसेच पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात दावोस समिट मध्ये करार झाले तर महाराष्ट्राला औद्योगिक आणि रोजगार निर्मिती अश्या दोन्ही पातळीवर फायदा होईल,असे पाटील म्हणाले
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0