“युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी विशेष युवक वार्षिक शिबिरातील उपक्रम
“युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी विशेष युवक वार्षिक शिबिरातील उपक्रम
लातूर दि.३१ मार्च
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, लातूर आणि आम्ही सेवक, हैप्पी व्हिलेज, हासेगाव ता.औसा जि.लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हॅप्पी व्हिलेज, हासेगाव येथे “युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी विशेष युवक वार्षिक शिबिरात मौजे हिप्परसोगा येथे दुग्धशास्त्र विभाग, प्राणीशास्त्र विभाग व हिप्परसोगा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पशुचिकित्सा व औषधोपचार शिबीर नुकतेच संपन्न झाले.
या शिबिराला प्राचार्य प्रो.डॉ.संजय गवई, मुख्य समन्वयक डॉ.नल्ला भास्कर रेड्डी आणि आम्ही सेवकचे संस्थापक प्रा.रवी बापटले यांचे मार्गदर्शन लाभले.
यामध्ये गर्भ तपासणी १५, वंधत्व तपासणी १९, उपचार २२, जंतनाशके १५४ देण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एस.हराळकर, डॉ.डी.जी.लंगर, डॉ.एस.एल.वाघमारे, डॉ. एम.आर.देवकाते आदि तज्ज्ञ डॉक्टरांनी पशु तपासणी व औषधोपचार केले.
या शिबिराच्या यशस्वीतेकरिता दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ.गुणवंत बिराजदार, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विनायक वाघमारे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे, प्रो.डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.मनोहर चपळे, प्रा.किसनाथ कुडके, डॉ.टि.घन:श्याम, शिबिरार्थी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मौलिक सहकार्य केले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0