‘जिल्हा परिषद जिंदाबाद’ नाटकास उस्तुरी येथे अभूतपूर्व प्रतिसाद मंदिर जिर्णोध्दारासाठी लाखोंची देणगी
‘जिल्हा परिषद जिंदाबाद’ नाटकास उस्तुरी येथे अभूतपूर्व प्रतिसाद मंदिर जिर्णोध्दारासाठी लाखोंची देणगी
लातूर, दि.३१ (प्रतिनिधी) - लातूर जिल्ह्याच्या नाट्यसृष्टीत ऐतिहासिक ठरलेल्या 'जिल्हा परिषद जिंदाबाद' या दोन अंकी नाटकाला निलंगा तालुक्यातील उस्तुरी या गावच्या ग्रामदैवतेच्या यात्रेत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. श्री नागनाथेश्वर मंदिर यात्रेनिमित्त आयोजित या प्रयोगाला नाट्यप्रेमींनी लोटांगण घालावा इतक्या उत्साहाने उपस्थिती लावली.
यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य लेखा वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर आणि सहा ते आठ मराठी चित्रपटांमध्ये यशस्वी भूमिका साकारलेले ख्यातनाम रंगकर्मी जे.डी. पवार यांची नाट्यातील जुगलबंदी विशेष आकर्षण ठरली.
नाटक पाहण्यासाठी उस्तुरी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. ग्रामपंचायत समोरील मैदान प्रेक्षकांनी तुडूंब भरले होते. नाटक संपल्यानंतर मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी लाखो रुपयांची देणगी जमा झाली. याचा स्वीकार यात्रा समितीचे आणि मंदिर समितीच्या अध्यक्षांनी केला.
या नाटकातील कलाकार रत्नराज जवळगेकर, जे.डी. पवार, सतीश रावजादे, वसंत गाडेकर, सुवर्णा सूर्यवंशी, दिलीप ढगे, लावणी सम्राज्ञी अपर्णा पवार, बालकलाकार तुलसी निलंगेकर यांच्या अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या कलाकारांचे कौतुक केले.
नाटक संपल्यानंतर कलावंतांना गर्दीतून बाहेर काढण्यासाठी बॉन्सरची मदत घ्यावी लागली. एवढ्या प्रमाणात प्रेक्षकांनी नाटकावर भरभरून प्रेम केले. ग्रामीण पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात नाटकास मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचे जाणकारांनी सांगितले.
गुढीपाडवा यात्रेच्या निमित्ताने हा प्रयोग लातूर जिल्ह्यातील उस्तुरी ता. निलंगा येथे सादर करण्यात आले. नाट्यप्रेमींनी हा ऐतिहासिक प्रयोग पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक दिपरत्न निलंगेकर यांनी केले आहे तर सहाय्यक म्हणून अनिरुध्द जंगापल्ले, निर्मितीची बाजू मोहिनी निलंगेकर यांनी तर रंगभूषा भारत थोरात, लाईट सुधीर राजहंस, संगीत दयानंद सरपाळे यांनी दिले. या नाटकामध्ये २५ पेक्षा अधिक कलावंत सहभागी झाले होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0