दयानंद विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
दयानंद विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
लातूर : मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा असून अभिजात मराठी भाषेचे वैभव व मराठी साहित्याचे दालन अत्यंत समृद्ध आहे.अशा या मराठी भाषेवर प्रेम करायला शिका.कारण आज बदलत्या जीवनशैलीमुळे माणूस बदलला व निसर्गही बदलला आहे.म्हणून युवा पिढींनी भाषेबरोबर आईबाप,भाऊ-बहीण व सर्व नातेवाईकांवरही प्रेम केले पाहिजे.आयुष्यात कलेची जोपासना केली पाहिजे.कारण कलासक्त व कलेवर प्रेम करणाऱ्या माणसाचं जगणं सोपं असतं.म्हणूनच कला व काव्य जपलं की जगणं आपोआप सुंदर होतं.संवेदनशील कवी आपली भावना अशी व्यक्त करतो की,
" नकली चेहऱ्यांची गर्दी आजूबाजूला
खराखुरा माणूस भेटावा एकदा तरी
मळा भक्तीचा असा फुल दे ह्रदयामध्ये
तुला भेटण्या विठ्ठल यावा एकदा तरी "
प्रेमाने भरलेला माणूस वाट्याला यावा असे प्रत्येकांचे आचरण असावे.माणूस व माणुसकी,देशभक्ती आणि भाषेची जोपासणा करावी.भाषा टिकली तरच संस्कृती टिकते,असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी योगीराज माने यांनी केले.
येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात दि.२८ जानेवारी २०२५ रोजी भाषा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ' कवितेचं गाव ' या काव्यगायन व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आपल्या ' पाऊस ',' बाप माझा ',' गुरु माझा ',' आभाळाला स्पर्श करावा ',' सखी माझी ' व ' माझी मुलगी ' अशा विविध कविता व गझलांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.मेघा पंडित,हिंदी विभाग प्रमुख डॉ.गजानन बने,मराठी विभाग प्रमुख डॉ.रामशेट्टी शेटकार,रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.सुरज कोल्हे व डॉ.अमोल ठोसर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे असे म्हणाले की,मराठी भाषा आपल्या संस्कृतीचा गाभा असून तिच्यामुळे परिवार,समाज व संस्कृती टिकते.आज मराठी भाषेवर इतर भाषांचे आक्रमण फार मोठ्या प्रमाणात होत आहे.अशा या काळात मराठी भाषेचे जतन व संवर्धन केले पाहिजे.
प्रास्ताविक प्रा.मेघा पंडित यांनी केले तर आभार डॉ.सुरज कोल्हे यांनी मानले.प्रमुख पाहुण्याचा परिचय डॉ.रामशेट्टी शेटकार यांनी करून दिला.सूत्रसंचालन शिवाणी छत्रबंद व आकांक्षा मिनियार यांनी संयुक्तरित्या केले.याप्रसंगी ग्रंथपाल प्रा.किरण भिसे,डॉ.मनीषा गुरमे,डॉ.प्रमोद माने,प्रा.सुरेंद्र स्वामी,राजसाहेब पांचाळ,सुनील राक्षे यांच्यासह इतर प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0