ज्येष्ठांसह नवोदितांचे कविसंमेलन रंगले; चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन
ज्येष्ठांसह नवोदितांचे कविसंमेलन रंगले; चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन
नांदेड - मराठी भाषा संवर्धन पंधरवडा नुकताच साजरा झाला. मराठी भाषेला अलिकडेच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. मराठी भाषेचे महत्त्व टीकविण्यासाठी मराठी बोलणे आणि मराठीत व्यवहार करणं आवश्यक आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मराठी भाषेचं संवधर्न करण्यासाठी निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्राच्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या आधीच साहित्य संमेलनातून ठराव घेऊन आणि कविसंमेलनाच्या माध्यमातून माय मराठी, मायबोलीचा जागर घडवून आणला. निमित्त होते चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे. समारोपापुर्वी झालेल्या कविसंमेलनाच्या सत्रात ज्येष्ठांसह नवोदितांनी मराठी मायबोलीचा जागर केला. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी बी. जी. कळसे हे होते तर अतिथी कवी म्हणून अशोक कुबडे, सदानंद सपकाळे, निरंजन तपासकर यांची उपस्थिती होती. तसेच स्वागताध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, निमंत्रक प्रल्हाद हिंगोले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, सचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, महिला विभाग प्रमुख रुपाली वागरे वैद्य, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर सचिव चंद्रकांत कदम, राहुल जोंधळे आदींची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी साहित्य मंडळ आणि प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुदखेड येथे चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. या संमेलनाच्या कविसंमेलन या सत्रात कवी बी. जी. कळसे यांच्या अध्यक्षतेखाली अशोक कुबडे, निरंजन तपासकर, सदानंद सपकाळे, प्रल्हाद हिंगोले, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, दत्ताहरी कदम, रुपाली वागरे, कैलास धुतराज, अनुरत्न वाघमारे, चंद्रकांत चव्हाण, राहुल जोंधळे, उषा ठाकूर, गोविंद कवळे, दत्ता वंजे, गणपत माखणे, गोविंद बामणे, धम्मोदय वाघमारे, सुमेध घुगरे, प्रकाश ढवळे, रामराव लक्ष्मण, रुपाली मोरे, दुर्गा पवार, शिरिष कुमार लोणकर, राजेश बडोले, ज्योती परांजपे, प्रतिभा पांडे, भारत सुर्यवंशी, सुभाष शिंगणकर, मारोती काळबांडे, जी. एस. भालेराव, डी. एन. मोरे, गौतम कांबळे, शुभम जाधव यांनी सहभाग नोंदविला. एकापेक्षा एक सरस आणि सुरस कवितांचे सादरीकरण करुन कविसंमेलनात रंगत भरली. कविसंमेलनाची सुरुवात अध्यक्ष कवी कळसे यांनी करुन दिली. सर्व कवी कवयित्रींना सन्मानचिन्ह, पुष्पहार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन अनुरत्न वाघमारे, कैलास धुतराज यांनी केले तर आभार राहुल जोंधळे यांनी मानले. अध्यक्षीय समारोप कवी बी. जी. कळसे यांनी केला. याहसत्रालाही नवोदित कवी कवयित्रींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या आणि प्रज्ञादर्शन शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0