डोळ्यांच्या मोफत तपासणीचा रुग्णांनी लाभ घ्यावा
डोळ्यांच्या मोफत तपासणीचा रुग्णांनी लाभ घ्यावा
नँबचे अध्यक्ष डॉ. विजय राठी
दि. ०८ एप्रिल
आज डोळ्यांच्या विविध आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. मुलांचा तिरळेपणा, मोतीबिंदू व डोळ्याचे इतर आजाराची मिरागी नेत्रालयातर्फे दि.०७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये सर्व रुग्णांच्या डोळ्यांची मोफत तपासणी केली जाणार आहे याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन नँब लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. विजयभाऊ राठी यांनी केले
लातूर व्यापारी धर्मशाळा मिरागी नेत्रालयाला २५ तिरळेपणा, मोतीबिंदू व डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहकार्य करणार आहे.
लातूर व्यापारी धर्मशाळाद्वारा सामाजिक बांधिलकी म्हणून काही कार्यक्षेत्रातील सेवाभावी संस्थांना आर्थिक सहकार्य करण्याच्या भावनेतून नँब संचलित मिरागी नेत्रालयासाठी आर्थिक सहकार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. याचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो व दारिद्र्यरेषेखालील सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. ही योजना फक्त ऑपरेशनसाठी असेल.
मिरागी नेत्रालय हे गीतांजली मार्केट, लातूर येथे असून तपासणीसाठी वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ०६ वाजेपर्यंत आहे. सर्व पेशंटनी सर्व कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
या सहकार्यासाठी अरविंद सोनवणे, लक्ष्मीरमण लाहोटी, रमेश राठी, दिनेश इनानी, हेमंत बोरा, ललित शहा, रमेश बियाणी, आशिष बाहेती आणि ईश्वरप्रसाद डागा आदींचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे असे सांगून अधिक माहितीसाठी (०२३८२) २५०८७६ किवा मो. ९९६००९२०३२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे नँबचे अध्यक्ष डॉ. विजयभाऊ राठी यांनी म्हटले आहे
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0