माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांची पणन मंत्र्यांकडे मागणी
माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांची पणन मंत्र्यांकडे मागणी
अहमदपूर दि.22
नगदी पीक म्हणून आणि ऐंशी टक्के सोयाबीन पेरणी क्षेत्राचा विचार करून सोयाबीन खरेदीला दिलेली मुदतवाढ अपुरी असून शेतकरी रब्बीच्या पेरणीमूळे सोयाबीन रास करू शकला नाही तसेच तूर फवारणी आणि ओलाव्याचे बंधन तर कधी बारदाना शॉर्टेज या बाबी मूळे शेतकरी सूरूवातीचा दिड महिना माल केंद्रावर आणू शकला नाही तसेच राज्यात झालेली नोंदणी व शिल्लक खरेदीचा विचार करून तातडीने 28 फेब्रुवारी पर्यंत खरेदी मुदतवाढ द्यावी अशी आग्रही मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी केली आहे.
पणन मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,
केंद्र सरकारद्वारा नाफेड मार्फत राज्यात हमी भावाने सोयाबीन खरेदी चालू केली आहे.शासनाने जर खरेदी चालू केली नसती तर सोयाबीनचे भाव ३५०० रुपये वर स्थीर झाले असते.आज सरासरी हजार रुपये जरी शेतकऱ्यांना वाढीव मिळाले तरी सरकारच्या बाजारातील हस्तक्षेपामुळे राज्यातील शेतकऱ्यांना बाजारपेक्षा अब्जावधी रुपये जास्त नक्कीच मिळाले आहेत.त्या बद्दल राज्य सरकारचे अभिनंदनच केले पाहीजे.
यावर्षी बाजारात हरभरा व तुरीला भाव हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे तुर व हरभरा खरेदी फार करावी लागणार नाही असे आज तरी वाटते. त्यामूळे विशेष बाब म्हणून २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत खरेदीस मुदतवाढ द्यावी.
तसेच जर मुदतवाढ शक्य नसेल तर बाजारातील भावांवर ८०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या शिष्टमंडळात ज्ञानोबा बडगीरे,माजी नगरसेवक डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,रामानंद मूंडे,धनंजय जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या निवेदनाच्या प्रती कार्यकारी संचालक/व्यवस्थापक नाफेड मुंबई,एम.डी. मार्केटिंग फेडरेशन मुंबई तसेच डी.एम.ओ. मार्केटिंग फेडरेशन लातूर यांना दिले आहे.
राज्यशासन या प्रकरणी तातडीने सकारात्मक भूमिका घेईल असे अश्वासन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी शिष्टमंडळास दिले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0