अदययावत उपचार तंत्रज्ञानासह लातूर जिल्हा रुग्णालयाची लवकरात लवकर उभारणी
अदययावत उपचार तंत्रज्ञानासह लातूर जिल्हा रुग्णालयाची लवकरात लवकर उभारणी
अदययावत उपचार तंत्रज्ञानासह लातूर जिल्हा रुग्णालयाची
लवकरात लवकर उभारणी होऊन रुग्णसेवा सुरू होईल
- माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
जागेसाठी आवश्यक असलेला निधी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठास
वर्ग करण्याचा शासन आदेश जारी
लातूर प्रतिनिधी : शनीवार दि. २९ मार्च २०२५
लातूर जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी आवश्यक असलेल्या ३ कोटी ३२ लाख ६८
हजार रुपयांचा निधी, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठास वर्ग करण्याचा शासन
आदेश निघाला आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून जागेअभावी प्रलंबित असलेल्या
या रुग्णालय उभारणीला गती येणार आहे. अदययावत उपचार तंत्रज्ञानासह लवकरात
लवकर जिल्हा रुग्णालयाची उभारणी पूर्ण होऊन तेथे रुग्ण सेवा सुरू होईल
असा विश्वास काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेतील मुख्य प्रतोद, माजी
मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
लातूर येथील जिल्हा रुग्णालय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडे वर्ग झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्याच काळात लातूर
येथे नवीन १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले होते. यासाठी
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या लातूर येथील कृषी महाविद्यालयाची १०
एकर जागा संपादित करण्याचे निश्चित झाले होते. जागा संपादित झाली परंतु
त्यासाठी आवश्यक असलेला मोबदला देण्यावरून जिल्हा रुग्णालयाची उभारणी
रखडली होती.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राज्याचे आरोग्यमंत्री
श्री, प्रकाश अबीटकर यांची तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.
शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन सदरील जागेसाठीचा मोबदला ३ कोटी ३२
लाख ६८ हजार ६५० रुपये मंजूर करून तो वसंतराव नाईक कृषी विद्यापीठास
वर्ग करण्याची विनंती केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी
मागण्याद्वारे सदरील निधी मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी आमदार अमित
देशमुख यांना दिले होते. माझ लातूर परिवारानेही यासाठी सातत्याने
पाठपुरावा केला होता. दिलेल्या आश्वासनानुसार सदरील निधी मंजुर होऊन
त्याचा शासन आदेशही आता निघाला आहे. हा निधी लवकरच वसंतराव नाईक कृषी
विद्यापीठाकडे वर्ग होणार आहे,लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी
यापूर्वीच निधीही मंजूर झालेला असून लवकरात लवकर रुग्णालयाची उभारणी
पूर्ण होऊन त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी रुग्णसेवाही सुरू
होईल असा विश्वास माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला
आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.
श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितजी पवार जिल्ह्याचे
पालकमंत्री मा. श्री. शिवेंद्रसींह राजे भोसले, सार्वजनिक आरोग्य मंत्री
मा. श्री. प्रकाश आबिटकर आणि राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील
यांनी लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीस गती दिल्याबद्दल त्यांचे माजी
मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आभार मानले आहेत.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0