महात्मा बसवेश्वरांचा मानवतावाद हाच अस्वस्थ वर्तमानात उन्नतीचा मार्ग
महात्मा बसवेश्वरांचा मानवतावाद हाच अस्वस्थ वर्तमानात उन्नतीचा मार्ग
प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के
लातूर दि. 03 जानेवारी
महात्मा बसवेश्वरांचा मानवतावाद हाच अस्वस्थ वर्तमानात उन्नतीचा खरा मार्ग आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक, वक्ते आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. ते येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्यावतीने आयोजित महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला २०२४-२५ उद्घाटन समारंभात पहिले विचारपुष्प गुंफताना प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते. व्याख्यानमालेचे उद्घाटक श्री. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर हे उपस्थित होते. विचारपीठावर व्याख्यानमालेचे संयोजक डॉ. रत्नाकर बेडगे हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संगीत विभागातील प्रा. विश्वनाथ स्वामी ,प्रा. गोविंद पवार आणि शिवाली मुकडे यांच्या स्वागत गीताने झाले. यावेळी शिवाजी स्वामी यांनी बसवगीताचे गायन केले.
पुढे बोलताना डॉ. राजकुमार मस्के म्हणाले की, आजच्या वर्तमानात वासनेचे भुजंग सर्वत्र वळवळ करताना दिसत आहेत, अशा भुजंगांना वात्सल्याची शिकवण द्यायला हवी. समाजातला विवेक हरवत जात असून मानवाच्या श्रद्धाही कमी झाले आहेत. प्रकृती आणि विकृतीला आकार देते तीच संस्कृती असते. आज आपण देशाची उदार मानवतावादी संस्कृती विसरून चंगळवादी बनत चाललो आहोत, अशावेळी ध्येयवादी आणि कृतिशील माणसं समाज सुधारणा करुन नवा इतिहास घडवू शकतात. भारतीय समाजात असलेला धर्मवाद, जातीवाद, प्रांतवाद, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, वृद्धांच्या समस्या यावर भाष्य करत करत व्यक्तीने आपल्या संवेदना जागृत ठेवल्या पाहिजेत. उगारणाऱ्या हातापेक्षा उभारणारी हात महत्त्वाचे असतात असेही ते म्हणाले.
आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनात माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांच्या विचार-आचार आणि तत्त्वज्ञानाचा वसा वारसा चालवणे आणि श्री. देशिकेंद्र महाराज यांनी सुरू केलेला हा ज्ञानयज्ञ अविरतपणे अखंडपणे चालू राहिला पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. महात्मा बसवेश्वरांचे विचार अंगीकृत केले तरच देशाचे भवितव्य उत्तम असेल असेही ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ. संजय गवई म्हणाले की, परिवर्तनाचा ध्यास आणि श्वास एकजीव झाल्यास सुदृढ आणि समृद्ध लोकशाहीची निर्मिती होते. महात्मा बसवेश्वरांनी बारावी शतकात अनुभव मंटपाच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया सर्व जगासाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या मानवतावादी धर्माचा अंगीकार सर्वांनी करावा असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे स्वागतपर मनोगत संयोजक डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. किसनाथ कुडके, डॉ. अश्विनी रोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी मानले.
या कार्यक्रमास माजी प्राचार्य डॉ. एम. एस. दडगे, प्रा. बी. एस. पळसकर, प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, प्रा. सुधाकर कुलकर्णी, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. बाळासाहेब गोडबोले, श्रोते, अभ्यासक प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मुख्य समन्वयक डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षिका प्रा. वनिता पाटील, IQACसमन्वयक डॉ. आनंद शेवाळे, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, सहसंयोजक डॉ. मनोहर चपळे, प्रा. संगमेश्वर पानगावे, प्रा. कल्पना गिराम, प्रा. जयश्री पाटील, प्रा. अनिता घवले, जलील सय्यद, शुभम बिराजदार, संतोष येंचेवाड, अशोक शिंदे यांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0