तर नववर्षाचा आनंद द्विगुणित होईल!
तर नववर्षाचा आनंद द्विगुणित होईल!
३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याकडे तरुण वर्गाचा कल असतो. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पब किंवा क्लब मध्ये जाऊन पार्टी करणे, दारू पिऊन गाडी चालवणे, हुल्लडबाजी करणे, सायलंसरच्या पुंगळ्या काढून आवाज करणे, मोठ्या आवाजाचे फटाके वाजवणे, डिजेच्या किंवा लाऊड स्पिकरच्या कर्णकर्कश आवाजात भिभत्स नृत्य करणे यासारख्या गोष्टी तरुण वर्गामार्फत केल्या जातात. यावर्षी तर हे प्रमाण खूपच वाढणार आहे कारण शासनानेच पब, क्लब, रेस्टॉरंट रात्रभर सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. पब, क्लब, रेस्टॉरंट रात्रभर सुरू राहणार असल्याने तरुणांनी आतापासूनच पार्टीची तयारी सुरू केली आहे. नववर्षाचे अशाप्रकारे स्वागत करणे म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा भंग करणे हे माहीत असूनही अशा गोष्टी केल्या जातात. अलीकडे तर या गोष्टी खूपच वाढल्या आहेत. दारू पिऊन नववर्षाचे स्वागत करण्याची फॅशनच हल्ली रूढ झाली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिलीच पाहिजे असाच समज तरुण वर्गाचा झाला आहे. दारू न पिताही नववर्षाचे स्वागत करता येते यावर त्यांचा विश्र्वासच नाही त्यामुळेच नववर्षाचे स्वागत दारू पिऊनच केले जाते. दारूचे दुष्परिणाम माहीत असूनही या गोष्टी केल्या जातात. दारू पिऊन भरधाव वेगात गाड्या चालवतात. दारू पिऊन भरधाव वेगात गाडी चालवल्याने बऱ्याचदा अपघात होतात. या अपघातात काही जण मरण पावतात तर काही जण जखमी होतात काही तर काही जण कायमचे जायबंदी होतात. दारू पिऊन गाडी चालवल्याने झालेल्या अपघातात घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब रस्त्यावर येते. दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजे स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालणे म्हणूनच नववर्षाचे स्वागत करताना स्वतःसह इतरांना त्रास होणार नाही याचे भान सर्वांनी ठेवावे. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना बंधनाची ऐशीतैशी होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी.
नववर्षाचे स्वागत म्हणजे चांगल्या वाईट गोष्टी दूर सारुण नववर्षाच्या सूर्योदयाच्या साक्षीने नव संकल्पाचा अवलंब करणे, त्याचे निश्चित धोरण ठरवणे, सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कामाला लागणे. यामुळे नव्या वर्षाचे स्वागत करताना पाश्चात्यांचे अंधानुकरण बंद करून प्रत्येकाने चांगले काम करण्याचा संकल्प केला पाहिजे.
आज जगाचा पोशिंदा संकटात आहे. आस्मानी आणि सुलतानी संकटांने पिचलेला बळीराजा आत्महत्या करीत आहेत. देशाचे रक्षणकर्ते जवान दहशतवाद्यांच्या, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद होत आहेत. दारूच्या नशेत नववर्षाचे स्वागत करण्यापेक्षा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, शहीद जवानांची मुले तसेच अनाथ मुलांना मदत करून आपण नव वर्षाचे स्वागत करू शकतो. आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाना आर्थिक मदत करून त्यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून, गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून, वृद्धाश्रमाला, अनाथ आश्रमाला आर्थिक मदत करून आपण नववर्ष साजरे करू शकतो. रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान. नववर्षाची सुरुवात जर आपण रक्तदान करून केली तर एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवल्याचे समाधान आपल्याला मिळू शकते. नवीन वर्षात अवयव दानाचा संकल्पही आपण करू शकतो.
छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरू शकतात त्यामुळे आपले आणि आपल्या प्रिय जणांचे जीवन अधिक समृध्द आणि अर्थपूर्ण होऊ शकते.
जुने जाऊ द्या मरणाागुनी.....
जाळूनी किंवा पुरूनी टाका....
या कवितेच्या ओळी प्रमाणे मागील वर्षीच्या सर्व चांगल्या वाईट भावना पुसून नव्या वर्षाचे स्वागत करायला हवे. सामाजिक बांधिलकीचे ऋण सेवेतून व्यक्त करण्याचा तसेच अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा संकल्प केला तर, नववर्षाचा आनंद द्विगुणित होईल.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0