हिंप्पळनेर-येथील-रेणुका-अंबा-गोशाळेत-सहकार-मंत्री-बाबासाहेब-पाटील-यांच्या-हस्ते-गोमातेचे-पूजन
हिंप्पळनेर-येथील-रेणुका-अंबा-गोशाळेत-सहकार-मंत्री-बाबासाहेब-पाटील-यांच्या-हस्ते-गोमातेचे-पूजन
चाकूरः-हिंप्पळनेरच्या गोशाळेचा आता होणार विकास, गोठा, पाणीटाकीसह चारा शेडचे भूमीपूजन केले आहे.तालुक्यातील हिंप्पळनेर येथील रेणुका अंबा गोशाळेत अडीचशे गोवंशाचा आपुलकीने सांभाळ केला जाते. गोमातेची सेवा हे पवित्र कार्य समोर ठेऊन पुढाकार घेणाऱ्या अनंत महाराज बेलगावकर यांना सहकार्य करण्यासाठी समाजातील भाविक, दानशूर व्यक्तीही सरसावत आहेत. दरम्यान, या गोशाळेत विविध सुविधा उपलब्ध होणार आहे.
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अंतर्गत येथे उभारण्यात येत असलेल्या गोठा, पाणी टाकी व चारा शेडचे भूमिपूजन सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव होते. संत बालयोगी देवपुरीजी महाराज, बापूदेव महाराज बेलगावकर, अनंत महाराज बेलगावकर, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. नाना सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, डॉ. एस. एन. शिंदे, गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, माजी सभापती आयोध्या केंद्रे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पद्माकर पाटील यांची उपस्थिती होती. सहकार मंत्री पाटील यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. राज्यात होत असलेल्या गोहत्यांवर निर्बंध घालण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे या मागणीचे निवेदन गोपालकांच्या वतीने सहकारमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी हिंपळनेरचे सरपंच अॅड. धनंजय कोरे, माजी सरपंच दयानंद सुरवसे, राहुल सुरवसे, सरपंच प्रा. हेमंत पाटील, भागवत कुसंगे, व्यंकटराव जांभळदरे, देविदास माने, राम पाटील, गणेश सूर्यवंशी, शैलेश देशमुख, नितीन पाटील, शरद पाटील, विठ्ठल सोमवंशी, महेश चेउलवार, ज्ञानोबा मलवाडे, तुकाराम मद्दे, पांडुरंग धडे, लालासाहेब शिंदे, सुधाकर माने, राम वाळके, लक्ष्मण पस्तापुरे, शिवशंकर हाळे, पी. एस. मद्दे आदी उपस्थित होते.
चौकटः-
गोशाळेत २५० गायींचा सांभाळ
हिंप्पळनेर येथील रेणुका अंबा गोशाळेत अनंत महाराज बेलगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली २५० गायींचा सांभाळ केला जात आहे. यासाठी विविध भाविकांचे सहकार्यही लाभत आहे. दरम्यान, कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या दानशूर भाविकांचा सत्कार करण्यात आला
चौकटः-
सहकारमंत्री पाटील यांच्याकडून मदत
गोमातेचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी अनंत महाराज यांच्या पुढाकारातून केली जात असून यासाठी आपणही खारीचा वाटा उचलावा म्हणून सहकार मंत्री पाटील यांनी वैयक्तिकरित्या एक लाख रुपयाची आर्थिक मदत गोशाळेला जाहीर केली
चौकटः-
रस्ता, भक्तिनिवासाच्या मागणीला प्रतिसाद
गोशाळेला अनेक जण भेट देण्यासाठी येत आहेत, गोशाळेकडे जाण्यासाठी रस्ता नाही तसेच आलेल्या भक्तांना राहण्यासाठी भक्तनिवासाची आवश्यकता असल्याची मागणी हिंप्पळनेरचे सरपंच धनंजय कोरे यांनी केली. तेव्हा ही मागणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तात्काळ मान्य करून गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांना रस्त्याच्या कामाचा व भक्तनिवासाचा प्रस्ताव तयार करण्याचा सूचना केल्या आहेत. यात सरपंच कोरे यांनी पुढाकार घेऊन हे काम तातडीने कसे होईल याकडे लक्ष देण्याचे सांगितले आहे
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0