कल्पकतेला कृतिशीलतेची जोड द्या, यशस्वी व्हा
कल्पकतेला कृतिशीलतेची जोड द्या, यशस्वी व्हा
आज दि. १ मार्च २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री- शिवकुमार डिगे यांच्या हस्ते ज्ञानप्रकाशच्या ‘सृजनानंद महोत्सवाचे उद्घाटन झाले.
मुलांची कल्पकता आणि चिकित्सकतेला नवनिर्मितीचा आनंद मिळवून देणार्या सृजनानंद महोत्सवाचे मा.न्या. शिवकुमार डिगे यांनी कौतुक केले आणि मुलांना शुभेच्छा दिल्या.
ज्ञानप्रकाशमध्ये मुलांना अनुभवातून शिकता यावे, गटागटातून, मित्रमैत्रिणींसोबत, संवादातून जीवनानुभव घेत पारंपारिक ते आधुनिकतेची सांगड घालता यावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो.
शिक्षणाची सुरुवात अ, आ, ई पासून ते आजच्या अख पर्यंत येऊन पोहोचली आहे. मुलांना जे शिकायला आवडतं ते करण्याची संधी ज्ञानप्रकाशमध्ये दिली जाते. त्यात भाषा, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान यासोबतच जीवनानुभव देणार्या गोष्टी म्हणजे शिवणकाम, लोकरकाम, लाकूडकाम, दागिने, पाककला, करस्व्हिरायटिंग, नेमप्लेट बनवणे, कीचेन तयार करणे, मेहंदी काढणे, विविध प्रकारची साडी परिधान करणे, केशरचना करणे इ. कौशल्य शिकून मुलांनी विविध वस्तू बनवल्या व त्याची मांडणी केली आहे.
या सर्व बाबी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अधोरेखित केल्या आहेत. परंतु ज्ञानप्रकाश ने मागील २५ वर्षांपासून मुलांच्या कल्पकतेला आणि कृतिशिलतेला संधी दिली आहे.
प्रकल्प प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर मुलांशी व पालकांशी संवाद साधताना न्यायमूर्ती शिवकुमार डिगे साहेब (मुंबई उच्च न्यायालय) म्हणाले की, "ध्येयाच्या मागे जाताना अपयश आले तर घाबरायचं नाही. अपयशाला सावरून पुढे जायचं आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवायचा.
स्वत:ला कधी कमी समजू नका. मागच्या बेंचवर बसणारा मी न्यायाधीश झालो. हे त्याचंच एक उदाहरण आहे. सध्या पालक त्यांचं स्वप्न मुलांवर लादतात आणि त्यांच्या भविष्याचा ताण पालकच अधिक घेतात. पण प्रत्येक मुलाचे एक स्वप्न असते. हे ही पालकांनी समजून त्यांना संधी द्यावी. २००५ च्या प्रकल्प प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मी वकिल असताना आलो आणि आज २० वर्षानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून २०२५ च्या सृजनानंद महोत्सवाचे उद्घाटन करताना मला मनस्वी आनंद होतो आहे. या २६ वर्षांच्या वाटचालित ज्ञानप्रकाशने गाठलेली उंची पाहून प्रकल्प प्रमुखांच्या दूरदृष्टीचे, शिक्षकांच्या परिश्रमांचे, मुलांच्या कल्पकतेचे व पालकांच्या सहकार्याचे मला कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख सतीश नरहरे यांनी केले तर सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी कृष्णाई आणि रुद्रानी यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री भाऊसाहेब सरवदे, प्राध्यापक बळवंत सूर्यवंशी केंद्राच्या संचालिका मुख्याध्यापिका सविता नरहरे परिसरातील नागरिक, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. दिनांक १ व २ मार्च रोजी होणार्या २ दिवसीय सृजनानंद महोत्सवास शिक्षणप्रेमी, पालक, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी ९ ते ५ या वेळेत भेट द्यावी, असे आवाहन ज्ञानप्रकाशच्या वतीने करण्यात आले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0