धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत - धनगर वधू-वर परिचय मेळाव्यात अर्चनाताई पाटील चाकूरकर
धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत - धनगर वधू-वर परिचय मेळाव्यात अर्चनाताई पाटील चाकूरकर
लातूर,दि.31 ः धनगर समाजातील सर्व प्रश्न शासन, प्रशासन दरबारी मांडण्यासाठी मी सदैव तुमच्यासोबत राहीन, अशी ग्वाही अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी दिली. त्या लातूर येथे आयोजीत करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या 19 व्या वधू-वर सूचक परिचय मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विष्णू कावळे होते तर अध्यक्षस्थानी मा. गो. मांडुरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, माझ्या राजकीय जीवनात धनगर समाज सातत्याने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या माझ्यासाठी आदर्शवत आहेत. धनगर समाजाचे जे काही प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी शासन-प्रशासन दरबारी मी कायम तुमच्या सोबत असेन समाज मला हाक मारेल तेंव्हा मी हजर राहीन अशी हमी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राज्य कारभार करत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्या सर्व संकटांवर त्यांनी खुबीने मात करत अनेक संकटांना परतवून लावले. वधू-वर निवड करणे ही एक सत्वपरिक्षा आहे. चांगला विचार करा, आपला जोडीदार निवडा असे आवाहन अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. विष्णू कावळे यांनी धनगर समाजाने आपल्या विविध प्रश्नासंदर्भात जागरूक राहावे असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप मंडळाचे अध्यक्ष सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी मा. गो. मांडुरके यांनी मंडळाचे कार्य असे मेळावे घेण्यामागचा उद्देश व समाज बांधवांचा मिळणारा प्रतिसाद, वधू-वरांच्या विक्रमी नोंदी झाल्याचे सांगितले. यावेळी काढण्यात आलेल्या नियोजीत वधू-वरांच्या नोंदी असलेल्या आकर्षक अशा स्मरणिकेचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. महापूरचे श्री माणिक आलुरे व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा काठी-घोंगडे देऊन भंडारा लावून अहिल्यादेवींची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अशोक चिंचोले, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकूर्ते, बाळकृष्ण धायगुडे, अॅड. मंचकराव डोणे, अॅड. सिद्धेश्वर धायगुडे, उद्धव दुधाळे, संभाजी सूळ, राजू मदने, सुभाष लवटे, अॅड. जीवन करडे, राम पाटील, संपत मदने, राजपाल भंडे, सुजीत वाघे, राम रोडे, नाना कसपटे, सुरेश अभंगे, सोपानराव वैद्य, मनोज राजे, अनिल गोयकर, चंद्रकांत हजारे, सूर्यकांत भोसले, प्रा. मधुकर सलगरे, विक्रम मांडुरके, पत्रकार उज्वलकुमार माने, प्रा. डॉ. महेश मोटे, महादेव काकडे, प्रा. लहुकांत शेवाळे, किशनराव कंदरफळे, मारूती भुरे, अॅड. राजेश बनसोडे, संपत गंगथडे आदीसह मोठ्या प्रमाणात पात्र तरूण-तरूणी, त्यांचे नातेवाईक, समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
19 व्या धनगर समाज वधू-वर परिचय मेळाचे अन्नदाते उपजिल्हाधिकारी कृष्णकांत चिकूर्ते, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकूर्ते होते. त्यांचा व सौ. चिकूर्ते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सुभाष लवटे यांनी मानले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वीरशैव तेली समाजाच्या नुतन दिनदर्शिकेचे प्रकाशन
लातूर,दि.31 : येथील वीरशैव तेली समाजातर्फे काढलेल्या नुतन दिनदर्शिकेचे प्रकाशन कार्यक्रम नुकताच भालचंद्र ब्लड बँक येथील हॉलमध्ये पार पडला. या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रमासाठी श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयाचे विश्वस्त अशोक भोसले, श्री जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळ सचिव बसवंत आप्पा भरडे, वीरशैव समाजाचे सचिव उमाकांतआप्पा कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीरशैव समाजाचे अध्यक्ष किशोर भुजबळ यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात बोलताना म्हणाले की, यावर्षी महिलांतर्फे नवरात्रीमध्ये देवीला कुंकूमार्चम पूजा व महाशिवरात्री काळात श्री सिद्धेश्वरास 500 महिलाच्यावतीने गंगेचा अभिषेक करण्यात आला होता. तेली समाज बांधवांनी समाजाभिमुख काम असेच चालू ठेवावे. सर्वांनी एकत्र येऊन काम करुया, अशी साद घातली. तसेच समाजातर्फे राबविण्यात येणार्या कार्यक्रमाविषयी पाहुण्यांना माहिती देण्यात आली. श्री सिद्धेश्वर मंदिर विश्वस्त अशोक भोसले यांनी गंगेच्या पाण्याचे अभिषेक साठी आपण जेवढ्या महिला घेऊन याल त्या सर्वांची व्यवस्था मंदिर समितीतर्फे करण्यात येईल असे सांगितले.
जय जगदंबा मंदिर सचिव बसवंतप्पा भरडे यांनी दरवर्षी नवरात्रीच्या दुसर्या माळेला आपल्याला कुंकुमार्चन पूजा करण्यासाठी समाजातर्फे केलेली मागणी मान्य केली. उमाकांत कोरे यांनी आपल्या समाजासाठी वीरशैव भवन हे सदैव उपलब्ध राहील असे आश्वासन दिले. प्रमुख पाहुण्यांचे ज्येष्ठ संचालकांतर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दिनदर्शिकेमध्ये जाहिरात देणार्या व्यावसायिक यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश व्यवहारे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष किशोर भुजबळ, सचिव अजय कलशेट्टी, सह सचिव इंद्रजित राऊत,कोषाध्यक्ष सुदर्शन क्षीरसागर,संचालक राजेश्वर हरनाळे, हनुमंत भुजबळ, युवराज लोखंडे व समाजातील युवा प्रमुख बाळू चोपडे, कृष्णाप्पा खडके, गणेश होकळे, विशाल देशमाने, गोपाळ विजय भुजबळ सह आदी वीरशैव तेली समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0