भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील संचलनात दयानंद विज्ञानचे तीन विद्यार्थी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील संचलनात दयानंद विज्ञानचे तीन विद्यार्थी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार
लातूर : २६ जानेवारी २०२५ रोजी नवी दिल्ली येथील ड्युटी पथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडनिमित्त आयोजित जय माँ भारती नृत्य महोत्सवात २५ ते ३५ वयोगटातून महाराष्ट्राचे कोळी नृत्य सादर करण्यासाठी दयानंद विज्ञान महाविद्यालयातील बी.एस्सी. द्वितीय वर्षातील सायली पंडित,बी.एस्सी.द्वितीय वर्षातील शिवकन्या भद्रे व बी.एस्सी.प्रथम वर्षातील अजित गुजर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.ही निवड रत्नागिरी येथील अथर्व वेद परंपरा कलामंचाच्या वतीने करण्यात आलेली आहे.या निमित्ताने दयानंद विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी हे ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात आपल्या कलाकौशल्याचा ठसा उमटवणार आहेत.महाराष्ट्राने कोकणातील कोळी नृत्य सादरीकरणाला प्राधान्य दिले असून महाराष्ट्रातील निवडक कलाकारांना सादरीकरणांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.त्यात दयानंद विज्ञानच्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या कोळी नृत्यामध्ये सहभागी असणारे हे तीन्ही विद्यार्थी गेल्या महिन्याभरापासून दिल्ली येथे दिग्गज दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली कोळी नृत्याचा सतत सराव करत आहेत.दयानंद विज्ञान गुणवत्तेच्या लातूर पॅटर्नप्रमाणे कलेच्या क्षेत्रातला लातूर पॅटर्न दाखवून आपली छाप पाडणार आहेत.दयानंद शिक्षण संस्था व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते,त्याचेच हे फलित आहे.
या प्रतिनिधीत्वाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,संस्थेचे सचिव रमेश बियाणी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.सदरील तिन्ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे कॅप्टन डॉ.विजेंद्र चौधरी व प्रा.मेघा पंडित यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0