प्राणप्रतिष्ठा लक्ष्मी यात्रा महोत्सवाचे आयोजन
प्राणप्रतिष्ठा लक्ष्मी यात्रा महोत्सवाचे आयोजन
उदगीर : उदगीरपासून जवळच असणाऱ्या कर्नाटकच्या भालकी तालुक्यातील मौजे मेथी - मेळकुंदा येथे दि. १९ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत श्री लक्ष्मी देवी मूर्ती स्थापना, प्राणप्रतिष्ठा आणि लक्ष्मी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ही परंपरा शिवकालपूर्वी वर्षापासून चालत आलेली असून मागील तीन वर्षांपासून नियमितपणे
हा महोत्सव उत्साहात साजरा केला जातो.
या सोहळ्यामध्ये भक्तगण, स्थानिक नागरिक आणि परिसरातील इतर गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. श्री लक्ष्मी देवीची मूर्ती गावातील ज्येष्ठ नागरिक गोविंदराव उर्फ बाबुराव कुलकर्णी (दिवाणजी) यांच्याकडून मिळणार आहे आणि त्यांच्याच हस्ते मूर्तीची स्थापना होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक दिलीपराव बिरादार, रघुनाथ बिरादार, व्यंकटराव बिरादार, किशोर कानेगावे, मधुकर कानेगावे, अप्पाराव रेड्डी, श्याम बिरादार, रमेश मोरे, नंदकुमार कुलकर्णी, बाबुराव पाटील, शेषेराव पाटील, तुकाराम मोरे, शिवाजीराव गुरनाळे, राजेंद्र घोरपडे, प्रकाश घोरपडे, बाबुराव बिरादार, संभाजी बिरादार, माधवराव बिरादार, देविदास बिरादार, सुनील बिरादार, ओमप्रकाश पवार, शिवाजीराव केदारे, श्रीनिवास कानेगावे, रामचंद्र रेड्डी, शिवा रेड्डी, मल्लिकार्जुन गुड्डे, धनराज गुड्डे, संगप्पा बोरोळे, शिवराज तेली, नंदकुमार बेल्लापुरे, मनोहर म्हेत्रे, शिवराज कुंभार, सतीश मोहिते हे आहेत.
विधीवत पूजा अर्चना आणि मंत्रोच्चाराने पूजा करून श्री लक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. महोत्सवात लक्ष्मी देवी मूर्तीची मिरवणुक गावातून काढण्यात येईल. मिरवणूकीदरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तनचे आयोजन केले आहे. महोत्सवाच्या समारोपानंतर सर्व भक्तांना महाप्रसाद वितरित करण्यात येईल.
या महोत्सवासाठी मेळकुंदा - वाडी, लंजवाड, तेलगाव, काकनाळ, लखनगाव, बोरोळ (ल), विजयनगर (गौंडगाव), शिवनी, तामगाळ, भाटसांगवी, बोळेगाव, पांढरी, हलसी, जिरगाळ, वागलगाव, खुदावंदपुर, इंचुर, भातंब्रा, रामतीर्थवाडी, भालकी इत्यादी ठिकाणाहून भक्तगण श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मोठ्या भक्ती भावनेने येतात. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी कुलकर्णी, जोशी, पाटील, बिरादार, गुरनाळे, मोरे, घोरपडे, केदारे, कानेगावे, मोहिते,
कदम, जाधव, पवार, तामगाळे, मरतोळे, वांजरखेडे, रेड्डी, स्वामी, तेली, बोरोळे, पारशेट्टे, गुड्डे, बागवान, गुडाकवाले, डफेदार, शेख, म्हेत्रे, लासूणे, बेल्लापुरे, गोसावी, तेली, पांचाळ (सोनार), कुंभार, वाघमारे,लोहार, गोंधळी, सूर्यवंशी, भोसले, कांबळे व सर्व गावकरी मंडळी यांचे योगदान राहणार आहे.
या महोत्सवासंदर्भात अधिक माहितीसाठी सरपंच दिलीप बिरादार यांच्याशी
9449435246 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धी प्रमुख अशोक गुरनाळे यांनी केले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0