अण्णाभाऊ साठे विद्यालय आणि कै.ग्यानदेव रामचंद्र शिंदे विद्यार्थी
अण्णाभाऊ साठे विद्यालय आणि कै.ग्यानदेव रामचंद्र शिंदे विद्यार्थी
वसतीगृहातील अनागोंदी विरोधात लातूर वंचितचे सोमवारपासून धरणे आंदोलन
लातूर,दि.१७ः ग्राम परिसर विकास शिक्षण संस्था,भोसा.जि.लातूर अंतर्गत लातुरात चालणार्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यालय आणि कै.ग्यानदेव रामचंद्र शिंदे विद्यार्थी वसतीगृहातील अनागोंदी,भ्रष्ट कारभार आणि अनियमितता प्रकरणी चौकशी करुन दोषींवर जबाबदारी निश्चित करावी आदी ११ मागण्यांसंदर्भात वंचित बहुजन आघाडी लातूरच्यावतीने दि.२० जानेवारी २०२५ पासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे लातूर शहर वंचित बहुजन आघाडीचे लातूर शहराध्यक्ष सचिन गायकवाड व महासचिव आकाश इंगळे यांनी दि.१६ जानेवारीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनामध्ये शासनाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये डी.एस.नरसिंगे यांना शाळेत प्रवेश देऊन ,सेवामुक्त शिक्षिका तेलंगे यांचा संभाव्य आरोप व हल्ला यापासून बचाव होण्याकरिता सेवामुक्त सहशिक्षिका तेलंगे यांना पाबंद करुन शाळेत येण्यापासून रोखण्यात यावे, सेवामुक्त कर्मचारी तेलंगे यांचे वेतन काढल्याबद्दल व सदर शाळेत अनेकांना चुकीच्या प्रभारी मान्यता देऊन नियमित मुख्याध्यापकाचे आर्थिक,प्रशासकीय अधिकार जाणीवपूर्वक काढल्याबद्दल संबंधित शिक्षणाधिकार्यांवर खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश देऊन शासकीय रकमेचा अपहार संगनमताने केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत,संबंधित सेवामुक्त सहशिक्षिकेने तिचे पती लक्ष्मण मस्के यांना बनावटी शिक्षक दाखवून शिक्षक मतदार म्हणून नोंद केल्या प्रकरणी दोघांवरही गुन्हे दाखल करावेत,तसेंच या प्रकरणी जिल्हाधिकारी स्तरावरुन झालेल्या सुनावणीचा निर्णय देण्यात यावा,संबंधित सेवामुक्त सहशिक्षिकेने तत्कालीन मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचार्यांच्या बनावटी सह्या करुन ८ लाख रुपये वसंतराव काळे पतसंस्थेकडून लोन उचलल्या प्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे आदेश द्यावेत, शिक्षणधिकारी मापारी यांनी दि.३ ऑक्टोबर २०२४, दि.४ ऑक्टोबर २०२४ आणि दि.१४ नोव्हेंबर २०२४ रोजी काढलेले नियमबाह्य पत्र रद्द करण्याचे आदेश द्यावेत, संस्थेअंतर्गत कागदोपत्री चालू असलेल्या वसतीगृहाची सखोल चौकशी करण्यात यावी,सदर संस्था शाळा आणि वसतीगृहावर प्रशासक नियुक्त करण्यात यावा,ज्यामुळे कारभार सुरळीत होऊन कर्मचार्यांच्या सेवासमाप्तीला आळा घालता येऊ शकेल, सदर प्रकरणी राजकीय हस्तक्षेपाचा चुकीचा झालेल्या वापर लक्षात धेवून न्यायालयीन आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे,सदर प्रकरणी यापूर्वी राजकीय हस्तक्षेपावरुन झालेल्या पत्रव्यवहाराची व फोन कॉलची सविस्तर माहिती संघटनेला देण्यात यावी आणि ११ कार्यकर्त्यांवर एफआयआर ८१६ने दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत,या मागण्यांचा समावेश आहे.
सदरील निवेदनाच्या प्रति राज्याचे शालेय शिक्षण मंत्री,शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, लातूर जिल्हाधिकारी,विभागीय शिक्षण उपसंचालक,जिल्हा पोलीस अधीक्षक, शिवाजी चौक,पोलीस ठाणे,लातूर यांना देण्यात आल्या आहेत.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0