सदस्यपदी अविनाश कोळी यांची निवड
सदस्यपदी अविनाश कोळी यांची निवड
लातूर : विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली असून विशेष स्वारस्य श्रेणी सदस्यपदी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अविनाश जालिंदर कोळी यांची निवड करण्यात आली आहे.
अविनाश कोळी यांचे भारतीय जनता पार्टीच्या संघटन कार्यात मोलाचे योगदान राहिलेले आहे. तुळजा भवानी रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी तत्कालीन रेल्वे मंत्र्यांशी सातत्याने पाठपुरावा करून तुळजापूरला फिरत्या रेल्वे आरक्षण केंद्राची सुरुवात करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यासाठी त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, रेल्वे मंत्री , रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांशी पाठपुरावा करून रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी ही सुविधा सुरु करण्याकामी मोलाचे योगदान दिले आहे. सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद या लोहमार्गाच्या उभारणीसाठीही तुळजा भवानी रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनिय लढा देण्याचे काम केले आहे. रेल्वे मार्गाच्या उभारणीमुळे तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर येणे अत्यंत गरजेचे आहे . तसेच साडेतीन पीठांपैकी एक तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक कायम दर्शनासाठी येत असतात. रेल्वेची सोय झाल्यास भाविकांची मोठी गैरसोय दूर होऊ शकणार आहे, यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न राहिले आहेत. रेल्वे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या अविनाश कोळी यांची विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0