विलास सहकारी साखर कारखाना युनिट-1 चा अंतिम ऊस दर
विलास सहकारी साखर कारखाना युनिट-1 चा अंतिम ऊस दर
विलास सहकारी साखर कारखाना युनिट-1 चा
अंतिम ऊस दर किमान रुपये 3000 प्रति मे.टन राहणार
सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांची घोषणा.
कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे प्राधान्याने गाळप सुरु.
पहीला हप्ता रु.2700/- प्रती मे.टन प्रमाणे बँक खात्यात वर्ग.
वैशालीनगर, निवळी ता. लातूर :
विलास सहकारी साखर कारखाना लि. युनिट-1, वैशालीनगर, निवळी या
कारखान्यामार्फत चालू गळीत हंगाम 2024-25 मध्ये ऊसास पहिला हप्ता आणि
किमान अंतिम ऊसदर देण्याबाबतचे धोरण मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, सहकार
महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी जाहीर केले आहे. या धोरणा प्रमाणे विलास
सहकारी साखर कारखान्याकडून पहीला हप्ता प्रति टन रुपये 2700/- प्रमाणे
अदा करण्यात येत असून व अंतिम ऊस दर किमान रुपये 3000/- प्रती मे. टन
प्रमाणे ऊस दर अदा करण्यात येणार आहे.
गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल
लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने, माजी मंत्री सहकार
महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व कारखान्याचे संस्थापक, माजी
मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे माजी आमदार व लातूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख,
कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास
सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
सन 2024-25 चा गळीत हंगाम सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने सुरू आहे. या गळीत
हंगामात 31 डिसेंबर अखेर 1 लाख 71 हजार 840 मे. टन ऊसाचे गाळप केले असून
दैनिक साखर उतारा 12.36 टक्के व सरासरी साखर उतारा 11.25 टक्के असून 1
लाख 76 हजार 510 क्विंटल शुभ्र दाणेदार साखरेचे उत्पादन झाले आहे. तसेच
चालू गळीत हंगामात कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे प्राधान्याने गाळप
करण्यात येत आहे. अशी माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन रविंद्र काळे व
कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.
गळीत हंगामामध्ये गाळपास आलेल्या ऊसास
पहीला हप्ता रु.2700/- तर किमान रु. 3000/- ऊसदर
मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी
जाहीर केलेल्या मांजरा परीवारातील निर्णयाप्रमाणे विलास साखर कारखान्याने
दि. 20 डिंसेबर 2024 अखेर गाळपास आलेल्या ऊसास पहिला हप्ता रू. 2700/-
प्रती टन प्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात
आलेला आहे. चालू गळीत हंगामामध्ये गाळपास आलेल्या ऊसास किमान रु. 3000/-
प्रती मे. टन प्रमाणे ऊस दर अदा करण्यात येणार आहे.
विलास कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक सभासदांच्या कल्याणासाठी कार्य केले
आहे. चालू गळीत हंगामात देखील विलास साखर कारखाना सर्वोत्तम ऊस दर
देण्याची परंपरा कायम राखणार आहे. या अनुषंगानेच विलास साखर कारखाना
अंतिम ऊस दर किमान रु.3000/- प्रती मे. टन प्रमाणे ऊस दर अदा करणार
असल्याने सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सेच कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांनी विलास युनिट-1 कारखान्यास
ऊस पुरवठा करण्याबाबतचे कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने आवाहन करण्यात
आलेले आहे. तसेच पुढील गळीत हंगामाकरिता कार्यक्षेत्रात मोठया प्रमाणावर
ऊस लागवड झालेली असून पुढील हंगामातील संपुर्ण ऊसाचे गाळपाचे सुक्ष्म
नियोजन काखान्यामार्फत करण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे
व्हा.चेअरमन रविंद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली
आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0