दयानंद विज्ञान महाविद्यालयातील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
दयानंद विज्ञान महाविद्यालयातील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
लातूर : रसायनशास्त्र या विषयाची व्याप्ती खूप व्यापक असून संपूर्ण विश्वामध्ये रसायनशास्त्र दडलेले आहे.आकाश,पाताळ आणि पृथ्वी तिन्ही लोकांत केमिस्ट्री आहे. दिनचर्यातील मानवी शरीराच्या हालचाली,जसे जांभई,झोप येणे व मनातील विविधांगी इच्छा-आकांक्षा अशा सर्वांगीण जीवनाला केमिस्ट्री प्रभावित करत असते.मानवी भावभावना,बुद्धी,संपूर्ण सजीव व निर्जीव सृष्टीला कवेत घेण्याचे सामर्थ्य रसायनशास्त्रात आहे.दैनंदिन जीवन जगत असताना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेमाची भावना प्रत्येकांच्या हृदयात दाटून येते.मन आणि मेंदूतून ती भावना उंचबळून येते.शरीरामध्ये होणारे हे हार्मोन्समधील बदल यामध्येसुद्धा रसायनशास्त्र आहे.सोसायटी,आरोग्य,उद्योग व फार्मसीसाठी रसायनशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा विषय सर्वव्यापी आहे.केमिस्ट्री हाच जीवनाचा सार आहे.म्हणूनच केमिस्ट्री ईज लाईफ,लाईफ ईज केमिस्ट्री,असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.बी.पी.बंडगर यांनी केले.
येथील दयानंद शिक्षण संस्था संचलित,दयानंद विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे दि.१३ते १५ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान आयोजित केलेल्या ' इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन केमिस्ट्री फॉर सोसायटी,हेल्थ,इंडस्ट्रीज ॲन्ड फार्मसी (आयसीसीएचएचआयपी-२०२५)' या विषयावरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला.यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे विश्वस्त सदस्य डॉ.सुरेश भट्टड होते.याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे सहाय्यक सचिव अजिंक्य सोनवणे,स्वारातीम विद्यापीठ,रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.डी.आर.मुंडे,माजी प्राचार्य डॉ.जे.एस.तुळबा,
महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सिद्धेश्वर बेल्लाळे,दयानंद फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.क्रांती सातपुते,रसायनशास्त्र विभाग डॉ.युवराज सारणीकर,आंतरराष्ट्रीय परिषद आयोजक डॉ.रवींद्र शिंदे व समन्वयक डॉ.नाथराव केदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप करताना दयानंद शिक्षण संस्थेचे विश्वस्त सदस्य डॉ.सुरेश भट्टड यांनी शिक्षण हा राष्ट्र उभारणीचा खरा पाया असून समाज व देशहितासाठी संशोधन केले पाहिजे आणि संशोधनाच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थ्यांनी करिअर घडविले पाहिजे,असे त्यांनी सांगितले तर डॉ.डी.आर.मुंडे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थीहिताचे असून विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेतील ज्ञानाचा फायदा भावी संशोधन व उज्ज्वल भविष्यासाठी करावा,असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक परिषद आयोजक डॉ.रवींद्र शिंदे यांनी केले तर आभार विभाग प्रमुख डॉ.युवराज सारणीकर यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.मेघा पंडित व डॉ.श्वेता लोखंडे यांनी संयुक्तरित्या केले.यावेळी जाफना विद्यापीठ,श्रीलंका येथील प्रा.जी.शशिकेश व ठाणे येथील डॉ.एम.आर.कुलकर्णी यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेतील तीन दिवसीय अनुभव व्यक्त केले.तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेतील पोस्टर व ओरल प्रेझेंटेशनमध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या संशोधक व प्राध्यापकांना प्रमाणपत्र,बुके आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नेपाळ,श्रीलंका,मलेशिया,इंग्लंड व भारत अशा देश-विदेशाच्या विद्यापीठातील शिक्षणतज्ज्ञ,संशोधक,मार्गदर्शक,तंत्रज्ञ,वैज्ञानिक,
उद्योगपती यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सहभागी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0