.हभप गुरवर्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्त शहरात भव्य मिरवणूक
.हभप गुरवर्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्त शहरात भव्य मिरवणूक
लोहा,(प्रतिनिधी)
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हभप वेदांत केसरी परम पूज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्त लोहा शहरात दि.(२७) रोजी आर्य वैश्य समाजबांधवांनी अतिशय जल्लोषात भव्य दिव्य अशी डोळ्याचे पारणे फिटेल अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी दि.२० डिसेंबर पासून दररोजच काकडा,श्रीस अभिषेक,ज्ञानेश्वरी पारायण, गीतापाठ, प्रवचन,हरिपाठ, हरि किर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रम घेवून सप्ताहाची सांगता दि.२७ रोजी शुक्रवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत सखाराम महाराज पालमकर यांचे अतिशय रसाळ वाणीत काल्याचे किर्तनाने झाली.
शहरात भव्य मिरवणूक
ह.भ.प.वेदांत केसरी परम पुज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या प्रतिमेची सजलेल्या रथातून नगरेश्वर मंदिर पासून भव्य अशी मिरवणूक निघाली. पुरूषांनी पांढरे शर्ट व पांढरी पँट ,महिलांनी एक सारखी, एकाच रंगाची साडी परीधान करून मिरवणुकीत सहभागु झाले.महिलांनी डोक्यावर कलश घेऊन,चिमुकल्या बालकांना सजलेल्या घोड्यावर स्वार होऊन प्रचंड मोठी अशी भव्य शोभायात्रा काढली.तसेच टाळ मृदंगाच्या तालावर लयबद्ध पावली खेळत मुखे हरिनामाचा गजर करीत पुरूषांनी, महिलांनी, मुलींनी आकर्षक ढोलपथकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.यावेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले.शहरातील मुख्य रस्त्याने मार्केट कमिटीच्या कमानीमधून मोंढा यार्डातून पुन्हा मुख्य रस्त्याने बसस्थानक, शिवकल्याण नगर मार्गे नगरेश्वर मंदिरात सांगता झाली.तद्नंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.विशेष म्हणजे समस्त आर्य वैश्य समाजबांधवांनी सर्वांनी आपापली प्रतिष्ठाणे बंद ठेवून सर्वांनी सहभाग नोंदविला.नगरेश्वर मंदिर समिती कमिटी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
सदरील भव्य शोभायात्रा मिरवणुकीत जागोजागी परम पूज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून असंख्य भाविकांनी मनोभावे वंदन केले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0