विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख आणि सर्व संचालक मंडळ सभासद, ऊसउत्पादकांच्या बांधावर, ऊसतोडणी बाबत साधला संवाद
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख आणि सर्व संचालक मंडळ सभासद, ऊसउत्पादकांच्या बांधावर, ऊसतोडणी बाबत साधला संवाद
लातूर प्रतिनिधी : शनीवार ४ जानेवारी
विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळी ता. लातूर या कारखान्याच्या
कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या गळीत हंगामासाठी होत असलेली ऊसतोडणीची
पाहणी आणि सभासद, ऊसउत्पादक शेतकऱ्यांशी संवाद सांधण्यासाठी चेअरमन
वैशालीताई विलासराव देशमुख आणि सर्व संचालक मंडळ प्रत्यक्ष बांधावर जाऊन
भेट देत आहे. या निमीत्ताने सभासदाच्या ऊसतोडणीत अडचण होवू नये, गळीत
हंगामातील ऊसगाळपाची कार्यक्षमता वाढवी यासाठी उपाययोजना करण्यात येत
आहेत.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी
शनिवार दि. ४ डिंसेबर रोजी कारखाना कार्यक्षेत्रातील वासनगाव येथे आशाबाई
व्यकंटराव जमादार, गंगापूर येथे दिनकर रामराव शिंदे, सावरगाव येथे
उर्मीला वसंतराव शिंदे, टाकळी शि. येथे किशोर दिलीप बचाटे, यांच्या तोडणी
होत असलेल्या ऊसप्लॉटची जाऊन पाहणी केली. यावेळी तोडणी होत असलेला ऊस
तसेच या भागात लागवड ऊसाची सदयाची परिस्थिती या बाबत कारखान्याचे सभासद
आणि ऊसउत्पादकांशी यांच्याशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी व्हा. चेअरमन रवींद्र काळे, दत्तात्रय बनसोडे, शिलाताई फुटाणे,
संचालक सर्वश्री गोविंद डूरे, गुरुनाथ गवळी, संजय पाटील, अनंत बारबोले,
रमेश थोरमोटे (पाटील), बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, भारत आदमाने,
हणमंत जाधव, मदन पाटील, सुखदेव खुणे, डॉ. सतीष कानडे, बिभीषण शिंदे,
आशाताई शिंदे, (सरपंच) तानाजी फुटाणे, पुष्पांजली भुसे, शामराव ढगे,
तुळशीराम शेळके, संतोष दगडे पाटील, गणेश रामराव ढगे, सईन माणिक झेंटे,
माधव कदम, नंदकुमार पाटील, राजेभाऊ बचाटे, ज्ञानेश्वर बचाटे, शिवाजी
शेळके, नारायण शेळके, श्याम शेळके, ज्ञानदेव तुमकुटे, ज्ञानेश्वर दगडे,
शेषराव पाटील, चंद्रकांत टेकाळे, गोविंद कदम, दत्तात्रय कदम, गुणवंत
बचाटे,सचिन अच्युतराव शिंदे, वसंतराव शिंदे, नेताजी टेकाळे, लक्ष्मण
शिंदे, महेंद्र श्यामराव मुळे, प्रभाकर गवळी, अशोक लोखंडे, उमाकांत
लोखंडे, विजयकुमार लोखंडे, रमाकांत आडसुळे, दिनकर इंगळे, गजेंद्र घुटे,
नंदू नागटिळक, जालिंदर घुटे आदी उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0